• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NEET UG 2026 च्या टॉपर्सची यादी जारी; यंदाही तरुणींचा डंका, महाराष्ट्रातून कोणी मारली बाजी?

July 17, 2026 by admin Leave a Comment


नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट युजी 2026 चा निकाल जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या 20 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यातील 11.21 लाख विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे. या परीक्षेत पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रासहित 8 राज्यांतील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करून टॉप 17 मध्ये स्थान पटकावलं आहे.

टॉप 17 रँकमध्ये 8 राज्याचा समावेश

पंजाब
हरियाणा
राजस्थान
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र
बिहार
तामिळनाडू
तेलंगाणा

नीट परीक्षेत तरुणींचा डंका पाहायला मिळाला. यंदा 11.21 लाख विद्यार्थी म्हणजे 58 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे. देशभरात एकूण 19 उमेदवारांना 700 हून अधिक गुण मिळवले आहेत. तर 1492 विद्यार्थ्यांनी 650 हून अधिक गुण मिळवले आहेत. तर 600 हून अधिक मिळवणारे एकूण 10 हजार 160 विद्यार्थी आहेत. या परीक्षेत पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी मोठं यश संपादन केलं आहे. या परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता, हरियाणाचा पांशुल बंसल या दोघांनी ऑल इंडिया रँक (AIR) प्रथम क्रमांक मिळवला आहे. दोन्ही उमेदवारांना 720 पैकी 715 गुण मिळाले आहेत. दोघेही नीट परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी ठरले आहेत. नीट परीक्षेचा निकाल गुरुवारी घोषित केल्याने MBBS, BDS, AYUSH आणि मेडिकलच्या अंडरग्रॅज्युएट कोर्सच्या अॅडमिशनचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचे स्थान

आर्यन गुप्ता – पंजाब – खुला गट- 99.9999 % – 715
पंशुल बंन्सल – हरियाणा – खुला गट 99.9999% – 715
उपलक्ष्य गोयल – राजस्थान – खुला गट- 99.99985 % – 714
आयुष भालोटिया – पुरुष – खुला गट – 99.99965 % – 713
कुडाले श्रावणी कृष्णा – महाराष्ट्र – ओबीसी-एनसीएल – महिला – 99.99965 टक्के – 713
रिया रंजन – बिहार -ओबीसी-एनसीएल – महिला – 99.99965% – 713
आर्यन दुबे – उत्तर प्रदेश – खुला गट – 99.99965 % – 713
गीतांश सरीन – पंजाब – खुला गट – 99.99915 % – 712
गौरव सिंह – राजस्थान – ओबीसी-एनसीएल – 99.99915 % – 712

केंद्रशासित प्रदेशात कुणी मारली बाजी?

लडाखमध्ये जिग्मेत यांगचन लामो (530 गुण), अंदमान आणि निकोबार द्विप समूहातून ध्रुव त्रिपाठी (606 गुण), लक्षद्विपमधून फहमिदा अनीस (573 गुण) गुण मिळवले आहेत. यात ईशान्य राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 17 राज्यातील टॉपर्सने 700 हून अधिक गुण मिळवले आहेत. तर 26 टॉपर्सने 690 हून अधिक गुण मिळवले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
  • Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
  • यंदाच्या बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त
  • Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
  • ‘द ग्रेट खली’च्या कारला अपघात, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणाला.. तुमच्या आशीर्वादाने

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in