
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली असल्याने चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला हा पक्ष त्यांना परत करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पक्ष संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवारच असल्याचा दावा त्यांनी केला. सध्या पक्षाच्या मालकी हक्काबाबतची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याचे सुळे यांनी नमूद केले.
एकीकडे सुप्रिया सुळे यांची ही मागणी असतानाच, जळगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवारांचे एकत्रितपणे स्वागत केले. यावेळी त्यांनी दोन्ही गटांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली. आपली विचारधारा पुरोगामी आणि बहुजन हिताची असून, ती पवारसाहेबांचीच असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ तांत्रिक दृष्ट्या युपीए आणि एनडीएमध्ये फरक असला तरी मूळ विचार एकच आहे असे ते म्हणाले.
Leave a Reply