• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यंदाच्या बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त

August 30, 2026 by admin Leave a Comment


हिंदू पंचांगानुसार गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत शुभ मानला जात आहे. खरं तर यावर्षी गणेश चतुर्थी 10 दिवसांऐवजी 12 दिवस विराजमान होणार आहेत. हा योगायोग जवळपास नऊ वर्षांनंतर जुळून येत आहे. पंचांगाच्या गणनेनुसार तारखांमधील फरकामुळे असा योगायोग अनेक वर्षांनी घडतो. चला तर मग इतर माहितीसह गणेशोत्सव कधी सुरू होईल ते तसेच शुभ वेळ, विसर्जनाचा मुहूर्त, महत्व जाणून घेऊयात.

गणेश चतुर्थी 2026 तारीख

द्रिक पंचांगानुसार 2026 साली भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा उपवास करणे आणि गणपतीची स्थापना करणे शुभ राहील.

गणेश चतुर्थी 2026 पूजा मुहूर्त

मध्यान्ह गणेश पूजेचा मुहूर्त – सकाळी 11 वाजून 02 मिपिटं ते दुपारी 01 वाजून 31 मिनिटांनी

कालावधी – 2 तास 28 मिनिटं

गणपती विसर्जनाचा मुहूर्त?

गणेशोत्सव संपल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीचे पवित्र नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते. यावर्षी अनंत चतुर्दशी शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी आहे. तथापि अनेक भक्त गणेशोत्सवाच्या दिवशी मूर्तीची स्थापना केल्यानंतर दीड, तीन, पाच किंवा अगदी सात दिवसांनीही तिचे विसर्जन करतात.

गणेश विसर्जन – 25 सप्टेंबर, शुक्रवार

चंद्रदर्शनास मनाई असलेली वेळ- सकाळी 09 वाजून 06 मिनिटं ते रात्री 08 वाजून 04 मिनिटं

कालावधी- 10 तास 58 मिनिटं

यंदा गणेशोत्सव 12 दिवस साजरा होणार!

पंचांगानुसार, 2026 मध्ये गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाने समाप्त होईल. या वेळी, तारखांच्या योगायोगामुळे, गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंतचा कालावधी नेहमीच्या 10 दिवसांऐवजी 12 दिवसांचा असेल.

14 सप्टेंबर 2026 भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी सकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी सुरू होते. तर भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी समाप्त 15 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी संपेल

गणेश चतुर्थीचे महत्त्व

मुद्गल पुराणाच्या चौथ्या विभागातील सातव्या अध्यायानुसार, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची मातीची मूर्ती बनवल्याने विशेष लाभ मिळू शकतो.

श्लोक

चतुर्थ्यं सर्ववर्णस्थैरभद्रे पूज्यो गजाननः ।

मृण्मयो विघ्नहिनास्ते भवन्ति सफल क्रियाः।

अर्थ- भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणेशाच्या मातीच्या मूर्तीची पूजा केल्याने अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
  • Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in