• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NEET 2026 : नीट परीक्षा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, आता परीक्षेची जबाबदारी लष्करावर? केंद्र सरकारचं मोठं पाऊल

May 28, 2026 by admin Leave a Comment


वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती, शेवटी ही परीक्षा रद्द करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे आता पुन्हा असा प्रकार घडू नये, त्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये आहे. या परीक्षेची जबाबदारी आता लष्कराकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी परीक्षेत पुन्हा पेपर लीक होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारकडून लष्करावर परीक्षेच्या पेपरची सुरक्षितता आणि गुप्तता याची जबादारी सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काही महत्त्वाचे मंत्री तसेच अधिकाऱ्यांची उच्चस्थरीय बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

आतापर्यंत 13 जणांना अटक 

नीट पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर येताच राज्यात मोठी खळबळ उडाली होती. शेवटी सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी ही केंद्राकडून सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने 13 जणांना अटक केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या देखील काही जणांचा समावेळ आहे. ज्यामध्ये मनिषा हवालदार, मनिषा मांढरे, शिवराज मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केली आहे, ते सध्या सीबीआयच्या कोठडीमध्ये आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in