• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले….

July 23, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स पोस्टनंतर CJP ने ती रिपोस्ट करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांचा संताप आणि दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत देशातील युवकांचे हित आणि भविष्य ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे म्हटले. नीट पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच अशा प्रकरणांचा जलद निकाल लागावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली.

मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार सातत्याने निर्णय घेत असल्याचे सांगितले. युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला.

विशेष म्हणजे, पंतप्रधानांच्या या पोस्टमध्ये दिल्लीतील CJP आंदोलनाचा थेट उल्लेख नव्हता. मात्र, राजधानीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया आल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, CJP ने पंतप्रधानांची पोस्ट रिपोस्ट करत, “धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा तर द्यावाच लागेल,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे नीट पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकारवर विरोधकांचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Special Report : एकामागून एक महाआपत्ती… नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?
  • Chitra Wagh : राजकारणात काम करतांना महिलांना अनेक..रितू तावडे, किशोरी पेडणेकरांना भेटल्यानंतर चित्रा वाघ यांचं महत्वाचं विधान
  • रक्षाबंधनावर आधारित हे गाणं ऐकून डोळ्यांत येईल पाणी, चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त
  • थलपती विजय आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, नव्या सर्व्हेमुळे राहुल गांधींची चिंता वाढली, नेमकी आकडेवारी काय
  • सचिनला येतीये सीमा हैदर अन् मुलांची आठवण, रडायला लागला, व्हिडीओमध्ये म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in