
राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईसह पुण्यातही पावसाने थैमान घातले. आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला. आज नाशिकला रेड अलर्ट जारी करण्यात आला. नाशिककरांवर मोठे संकट आहे. नाशिकला फक्त रेड अलर्टच नाही तर यासोबतच ढगफुटीचा इशारा देण्यात आला. प्रशासन अलर्ट मोडवर असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. शाळा कॉलेजला सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. ढगफुटी होणार असल्याचा अंदाज असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. ढगफुटीमुळे काही सेकंदात होत्याचे नव्हते होते. त्यामध्येच 300 मिमी पाऊस यादरम्यान होण्याचा मोठा अंदाज आहे. नागरिकांना आवाहन केले जातंय. सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली. धबधब्यांवर नागरिकांना न जाण्याचा सूचना दिल्या जात आहेत.
काल रात्रीपासूनच नाशिकमध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे. ढगफुटीचा इशारा असून नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. नाशिक त्रंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. काल रात्रीपासून त्रंबकेश्वर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहरात आज सकाळपर्यंत 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्येच 300 मिमी पावसाचा अंदाज आहे.
ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बारीक नजर आहे. आज दुपारपर्यंत त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये मुसळधार होणार असल्याचा भारतीय हवामान विङागाचा अंदाज आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीच झपाट्याने वाढ होत आहे. यादरम्यानच प्रशासनाने एकाचवेळी 300 मिमी पावसाचा अंदाज असल्याने धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू केला. प्रत्येक काळजी घेतली जात आहे.
मोठी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी होण्याचा अंदाज असल्याचे सांगितले होते. गिरीष महाजन देखील नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, याकरिता काळजी घेतली जात आहे. राज्यात यंदा पाऊस उशिराने दाखल झाला. मात्र, पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. रायगड आणि पुण्यातही पावसाचा रेड अलर्ट आहे.
Leave a Reply