• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik IT Company : TCS कंपनीतील पीडित तरुणींनी इतका टोकाचा कॉर्पोरेट जिहाद का सोसला? खरं कारण आलं समोर, तुम्हालाही खूप वाईट वाटेल

April 20, 2026 by admin Leave a Comment


TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीने सोसला कॉर्पोरेट जिहाद. कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरेपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली, अशी सूत्रांची माहिती. दुसऱ्या पीडितेवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची सूत्रांची माहिती. आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले, घरात अन्नाचा कण नाही, कुटुंबाच्या पोटाच्या भुकेसाठी पीडितीने सर्व सहन केले असं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील जाणून घेतली पीडितांची आपबिती.

काल TCS कंपनीत जाऊन देखील पथकाने तब्बल दीड तास चौकशी केली. कंपनीतील पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, कामाचे विभाग, कॅन्टीन, वेटींग रूमची केली पाहणी. आज सलग तिसऱ्या दिवशी महिला आयोगाकडून होणार या प्रकरणाची चौकशी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून गेल्या 2 दिवसापासून TCS प्रकरणी झाडाझडती सुरु आहे. महिलांवरील अत्याचार, विनयभंग व धर्मांतराच्या प्रयत्नांचा गंभीर आरोप आहेत.

कॅन्टीन, वेटिंग रूमसह विविध विभागांची पाहणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या चार सदस्यीय पथकाची नाशिकच्या TCS कंपनीत जाऊन प्रत्यक्ष भेट व तपास. पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात. TCS कंपनीतील कार्यालय, कॅन्टीन, वेटिंग रूमसह विविध विभागांची पाहणी. आतापर्यंत या प्रकरणी 9 गुन्ह्यांची नोंद आहे. सुरक्षा व्यवस्था व महिलांसाठीच्या सुविधांचीही तपासणी. POSH अंतर्गत तक्रार समिती कार्यरत आहे का? याची देखील चौकशी केली. चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर होणार.

निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यता

नाशिक TCS प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यता. नाशिक न्यायालयात सुनावणीची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार आहे. TCS प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांचे पथक निदा खानच्या शोधात आहे. निदा खान गरोदर असल्याची देखील माहिती आली होती समोर. निदा खानच्या वकिलानी अटकपूर्व जामीनसाठी नाशिक न्यायालयात अर्ज केला आहे. आजच्या सुनावणीत काय होणार? याकडे लक्ष.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nari Shakti Vandan Adhiniyam : …तर 273 महिला संसदेत गेल्या असत्या : देवेंद्र फडणवीस
  • गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा; CCTV मध्ये बॉलिवूडचे दोन..
  • Sanjay Raut | …तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
  • IPL 2026 Rohit Sharma : MI च्या पुढल्या मॅचपूर्वी चाहत्यांसाठी ती बातमी आलीच… रोहित शर्माबाबत मोठी अपडेट काय ?
  • भारतात रशिया युद्धनाैका तैनात करणार, तब्बल 3000 सैनिकही, थेट रशिया आणि भारताने..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in