• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik IT Company: टीसीएसमध्ये ब्लॅक मॅजिक! त्या दाव्याने एकच खळबळ, आरोपी दानिशचा मोबाईल अनलॉक…होणार मोठे गौप्यस्फोट

April 25, 2026 by admin Leave a Comment


Nashik IT Company Black Magic : टीसीएस कंपनीला केवळ एकाच धर्मियांना दिलेली सवलत चांगलीच महागात पडली. कंपनी देशभरात बदनाम झाली. या आयटी कंपनीत धर्मांतरण आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा भांडफोड झाल्यावर संतापाची लाट उसळली. तर या प्रकरणात काळी जादू वापरल्याचाही आरोप होत असल्याने नाशिकच्या बुवाबाजीत अजून भर पडली आहे. आरोपी दानिश शेख याचा मोबाईल अनलॉक झाला आहे. त्याने मोबाईलमधील प्रत्येक ॲप्लिकेशन आणि फाईला स्वतंत्र पासवर्ड ठेवले होते. तसेच त्याला फेस आयडीचे सुरक्षा कवच लावले होते. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीत अडचण येत होती. न्यायालयाच्या विशेष परवानगीने आरोपीला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आले. त्यात फेस आयडीचा वापर करून मोबाईल अनलॉक करण्यात आला.

दानिशच्या मोबाईलमधून काढण्यात येणार डेटा

मोबाईल अनलॉक झाल्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने डेटा काढला. पुढील तपास सुरू केला. धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात मुंबई पोलिसांचीही एंट्री झाली आहे. न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट मिळवून चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा सर्व आरोपी 30 ते 38 वयोगटातील आहेत.

टीसीएस कंपनीतील हे आहेत ते आरोपी

दानिश एजाज शेख

तौसिफ बिलाल अत्तर

रजा रफीक मेमन

शाहरुख हुसैन शौकत कुरेशी

मोहम्मद शफी शेख

आसिफ आलम आफताब आलम अन्सारी

निदा एजाज खान (अद्याप फरार)

अश्विनी अशोक चेनानी

ब्लॅक मॅजिक चा गंभीर आरोप

ताब्यात घेतलेल्या चार ही आरोपींवर जबरदस्ती धर्मांतरण, मादक पदार्थ देऊन महिलांना जाळ्यात ओढणे, महिलांचे लैंगिक शोषण करणे असे आरोप करण्यात आले आहेत. तर आरोपी इतर धर्मियांवर सातत्याने दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. हिंदू देवी-देवतांवर ते अश्लाघ्य भाषेत टीका करत होते. तर अश्लील पासवर्ड त्यांनी ठेवले होते. कंपनीच्या बैठकीवेळी आणि व्हॉट्सअपवरही आरोपी कंपनीतील महिला कर्मचार्‍यांना उद्देशून अश्लील कमेंट, शेरेबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणाचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी धागेदोरे असल्याचे समोर येत आहे. तर अजमेरचा कोणी मौलानाचे ही कनेक्शन असल्याचे म्हटले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बिनडोकपणाचा कळस… मुलीवर वाईट नजर नको म्हणून बापाने थेट… जे काही घडलं त्याने अमरावती पुन्हा हादरली
  • त्याने मला घट्ट पकडलं, कार सुरु केली आणि…, मुंबईच्या रस्त्यांवर मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
  • Sanjay Dutt Wife Manyata : चित्रपटाच्या घोषणेचा कार्यक्रम पण अचानक काय झालं, संजू बाबाच्या पत्नीला इवेंटमध्ये सर्वांसमोर कोसळलं रडू
  • सावधान! ITR मध्ये चुकीची माहिती भरली तर 200 टक्के दंड, आयकर विभागाचे नवीन नियम लागू
  • Bageshwar Baba: चार मुलं पैदा करा आणि एक… RSS चा उल्लेख करत हिंदू धर्मीयांना धीरेंद्र शास्त्री यांचे मोठे आवाहन काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in