• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Narendra Modi Video : नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर शेअर केला नवा व्हिडीओ, जेन झी, तरुणांना दिला खास संदेश!

August 9, 2026 by admin Leave a Comment


Narendra Modi Video : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक अशा समाजमाध्यमांवर व्हिडीओच्या माध्यमातून ते तरुणांशी बोलत आहेत. मोदी यांनी व्हिडीओ अपलोड केल्यावर अवघ्या काही मिनिटांत त्याला लाखोंंनी व्ह्यूज आणि हजारो लाईक असतात. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर आणखी एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी तरुणांना एक खास संदेश दिला आहे.

खेळाडूंनी घेतली मोदी यांची भेट

ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताने चांगली कामगिरी केली. भारतासाठी पदकं मिळवणाऱ्या खेळाडूंशी मोदी यांनी रविवारी, 9 ऑगस्ट रोजी संवाद साधला. मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी त्यांनी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. या भेटीचा एक व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

खेळाडूंनी केले मोदी यांचे कौतुक

व्हिडिओमध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी साक्षी चौधरी यांच्यासह अनेक पदकविजेते खेळाडू पंतप्रधान मोदींसोबत दिसत आहेत. या व्हिडीओत साक्षी चौधरी यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी मोदी यांचे कौतुक करत ते अत्यंत साधे आणि मनमिळावू असल्याचे म्हटले.

तरुणांना कोणता संदेश दिला?

यानंतर साक्षी यांनी पंतप्रधानांना तुम्हीही काहीतरी बोला, अशी विनंती केली. त्यावर मोदी यांनी भारतातील समस्त तरुणाईला “जो खेलेगा, वो खिलेगा”, असा संदेश दिला. तसेच त्यांनी यावेळी त्यांनी ‘भारत माता की जय’चाही नारा दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

बॉक्सिंगमध्ये भारताची दमदार कामगिरी

दरम्यान, ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी यंदा उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने एकूण 39 पदके जिंकत पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. यात 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. भारताने या क्रीडा प्रकारात एकूण 10 पदके जिंकली. त्यामध्ये 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांचा समावेश आहे. त्यामुळे ग्लासगोमधील भारतीय बॉक्सिंग संघाची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in