
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. 587 पीएच.डी. (Ph.D.) संशोधकांसह पदवी प्राप्त करणाऱ्या 3 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केलं. आयुष्यातील एका अत्यंत अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घेत आहात, असं पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं. यापूर्वी जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधला होता, तेव्हा तो कोविड काळातील असल्याने आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून झाला होता असं ते म्हणाले. आज तुम्हाला समोर पाहून, भेटून खूप छान वाटतयं असं ते म्हणाले. तुमच्या मनात बरंच काही चाललं असेल, मी बाबा बागेश्वर तर नाही, पण तुमच्या मनात बरेच विचार असतील, असंही त्यांनी नमूद केल. ‘जो शिकेल, तोच जिंकेल,’ असा कानमंत्रही पंतप्रधानांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
अनेक मित्र आपल्या पहिल्या स्टार्टअपचं स्वप्न पाहत असतील, तर कोणी पुढच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असेल. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. प्रत्येकाचं स्वप्न वेगळं आहे. यात एक गोष्ट अशी आहे ती सर्वांच्या मनात एक सारखी आहे, असं पंतप्रधान म्हणाले. जेव्हा तुमचा आयआयटी दिल्लीत पहिला दिवस होता, तो दिवस आठवा आणि आजच्या दिवसाचंही स्मरण करा. कालचीच तर गोष्ट आहे, तेव्हा ओरिएन्टेशन झालं आणि आता कन्वोकेशन होत आहे. तुम्हाला समाधान वाटत असेल. तुम्हाला जीवनाच्या नव्या अध्यायाबद्दल उत्साहही वाटत असेल, असं म्हणत ‘ आजचा क्षण जगून घ्या’, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.
तुमच्या आवडत्या ठिकाणी घालवलेला वेळ किंवा वसतिगृहातील (हॉस्टेलमधील) दिवस अशा काही जुन्या आठवणींना तुम्ही आज उजाळा द्याल, असं मोदी बोलताना पुढे म्हणाले. बदलात्या काळात आव्हानं येणं अपरिहार्य असते, पण त्या दरम्यान हे लक्षात ठेवा की: जे सतत शिकत राहतात, तेच यशस्वी होतात. तुम्ही इथे केवळ परीक्षा उत्तीर्ण झालात किंवा पदव्या मिळवल्यात असं नाही; तर त्यापलीकडे जाऊन तुम्ही गुंतागुंतीच्या समस्या कशा सोडवायच्या, हे शिकलात. येथील शैक्षणिक प्रवास सोपा नव्हता—तुम्ही ही पदवी एका रात्रीत मिळवलेली नाही; उलट, सत्र-मध्य परीक्षा (mid-semester exams), प्रकल्प आणि अशा अनेक छोट्या-छोट्या टप्प्यांतून प्रवास करत तुम्ही या क्षणापर्यंत पोहोचला आहात, असंही पंतप्रधानांनी नमूद केलं.,
विद्यार्थ्यांना दिला खास सल्ला
पुढे मोदी म्हणाले, मित्रांनो, या भावूक क्षणी मी एक गोष्ट तुम्हाला जरूर सांगेन, ती म्हणजे, जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला मागे वळून पाहण्याची संधी देईल, तेव्हा लक्षात ठेवा की हे कॅम्पस लाईफ, तुमचे मित्र, शिक्षक, मेंटॉर आणि स्टाफ हे तुमचं कुटुंब बनलं होतं. तुमच्या प्रोफेसरनी तुम्हाला घडवलं, तुम्हाला आकार दिला. हे कॅम्पस हळूहळू तुमचं घर बनलं. तुमच्या प्रत्येक यशात, या सर्वांची आठवण ठेवा, विसर पडू देऊ नका असं ते म्हणाले. या सर्वांबाबत कृतज्ञ व्हा. या गोष्टी असेट म्हणून घेऊन जा, त्या विसरून जाऊ नका. सोबत न्या. जाता जाता तुम्ही एकमेकांना भेटून जा हा माझा सल्ला असेल. कुठेही राहाल, तेव्हा हाच प्रयत्न करा की हे नातं कायमचं राहील, असा सल्लाही मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
Leave a Reply