• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Narendra Modi: आयुष्याच्या परीक्षेत सर्वच आऊट ऑफ सिलेब्स… पीएम मोदींचा विद्यार्थ्यांना तो खास मंत्र

August 8, 2026 by admin Leave a Comment


आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट तरुणाईशी संवाद साधला. देशात 35 दिवसांहून अधिक काळ CJP चे जंतरमंतरवर आंदोलन सुरू होते. तरुणाईची भाषा सरकारला कळत नसल्याचा आरोप होत होता. त्यानंतर मोदींनी इन्स्टावरून तरुणाईला साद दिली. आज त्यांनी आयआयटीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी क्रमिक अभ्यासक्रम आणि जीवनातील परीक्षेचा भेद स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मोठा मंत्रही दिला.

आयुष्याच्या परीक्षेत सर्व काही ऑऊट ऑफ सिलेब्स

ही पदवी एका दिवसात मिळाली नाही. एक एक विषय, एक एक प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं. त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत आला आहात. जीवनही याच सिद्धांतावर चालते. जेव्हा आव्हान मोठं वाटेल तेव्हा घाबरू नका. त्याला छोट्या छोट्या भागात विभागून घ्या. आयुष्यातही आव्हाने येतील याचा उल्लेख मोदींनी भाषणातून केला. त्यांनी महाविद्यालयीन जीवन आणि आयुष्य यातील फरक विषद केला. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. आयुष्यातील काही गोष्टी तुम्हाला सांगतो. कॅम्पसचं जीवन आणि त्याबाहेरचं जीवन यात मोठं अंतर असतं. आयआयटीच्या परीक्षेत सिलॅब्स असतो. पण आयुष्याच्या परीक्षेत सर्व काही आऊट ऑफ सिलेब्स असतो, असे मोदी म्हणाले. प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला जगा असे आवाहन त्यांनी केले.

खऱ्या आयुष्याचा आरसा दाखवला

कॅम्पस लाईफमध्ये सर्व फंडे क्लिअर होतात. काय शिकायचं आहे. कोणती असाईनमेंट पूर्ण करायची आहे, कोणती परीक्षा द्यायची आहे हे सर्व आधीपासूनच ठरलेलं असतं. पण जिंदगी वेगळ्या प्रकारे चालते. तिथे ना कोणता कोर्स असतो ना कोणती प्रश्नपत्रिका असते. अनेकदा तर खरा प्रश्न कोणता होता हे कोणी साांगत नाही. तो सवाल तुम्हालाच शोधावा लागतो, असा मंत्र पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

उपाय शोधण्याचं धाडसही दाखवा

जगाने प्रश्न मानणं सोडलं होतं, त्या प्रश्नांचं उत्तर पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी शोधलं. काहींनी तर त्या समस्यांशी जुळवून घेतलं होतं. त्यामुळे आयुष्यात क्युरेसिटी ठेवली पाहिजे. चेतना जागृत ठेवा. विचार न करता ज्या गोष्टी स्वीकारल्या जातात, त्या ओळखा. त्यावर प्रश्न करा आणि त्यावर उपाय शोधण्याचं धाडसंही करा. हाच विचार तुमचं वेगळंपण सिद्ध करेल, असा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रत्येक पिढीच्या समोर त्या काळाची आव्हाने असतात. जबाबदाऱ्याही वेगळ्या आहेत. तुमच्या आयुष्यात ३० ते ३५ वर्षात तुम्ही जे काही कराल ते आपल्या विकसित भारतासाठी उपयोगी ठरेल. त्यामुळे तुम्ही कोणताही निर्णय घेताना याने देशाचा काय फायदा होईल, देशाच्या कोणत्या गरजा पूर्ण होतील याची जाणीव ठेवली पाहिजे, हे सांगायला मोदी विसरले नाहीत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in