
Naimisha Pradhan : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळत आहे. नीट पेपरफुटी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सीजेपीने केली आहे. याच मागणीला घेऊन देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. देशातील शिक्षणव्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी हे आंदोल सुरू आहे. एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच अचानक धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधान यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्या परदेशात कायद्याचे शिक्षण घेतल्याने त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. याच ट्रोलिंगमुळे आता निमिषा प्रधान यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
निमिषा प्रधान यांनी इन्स्टाग्राम खातं केलं बंद
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने आपले इन्स्टाग्राम खाते बंद केले आहे. सध्याच्या सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांच्या मुलीवर टीका केली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना तिने आपले खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ट्रोल केलं जात होतं.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply