• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Rain Update : मुंबईत उधाणलेल्या समुद्रात अजब घडलं, अचानक समोर आलं गूढ जहाज, मध्ये नेमकं काय? सस्पेन्स वाढला!

July 7, 2026 by admin Leave a Comment


Suspicious Ship Found In Mumbai Ocean : सध्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यात मुंबईही सुटलेली नाही. मुंबई, उपनगरात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. अजूनही लोकलची व्यवस्था सुरळीत झालेली नाही. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकांना पाऊसधारांसोबतच लोकलच्या दिरंगाईचाही सामना करावा लागत आहेत. सध्याचे हवामान लक्षात घेता प्रशासनाने समुद्राजवळ बसण्यास मनाई केलेली आहे. तसेच समुद्रात जहाजांनाही जाऊ दिले जात नाहीये. मासेमारी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असतानाच आता एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या समुद्रात एकामागून एक एकूण दोन संशयित जहाजे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या समुद्रात एकामागून एक दोन संशयित जहाजे आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनोरी बीचनंतर आता मढच्या सिल्वर बीचजवळही एक संशयित जहाज दिसून आले आहे. पोलीस आणि तटरक्षक दलाची टीम तपासात गुंतलेली आहे. दोन दिवसांपूर्वी गोराईच्या मनोरी बीचवर एक संशयित जहाज सापडले होते. ते जहाज भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताब्यात आणि निगराणीत घेतले आहे. आता आज संध्याकाळी मालाडच्या मढ येथील सिल्वर बीचजवळ समुद्रात आणखी एक संशयित जहाज दिसले.

जहाजात नेमकं काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज किनाऱ्यापासून सुमारे 7-8 किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. हे जहाज नेमके कुठून आले, ते कोणत्या देशाचे आहे आणि त्यात काय सामान आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तटरक्षक दल आणि स्थानिक पोलीस मिळून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. हे जहाज मढपर्यंत कसे पोहोचले याचाही शोध घेतला जात आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईच्या समुद्री भागात दिसलेले हे दुसरे संशयित जहाज आहे. दरम्यान, तटकरक्षक दलाने तसेच पोलिसांनी या जहाजाची तपासणी केल्यानंतर त्यात नेमके काय आहे, हे स्पष्ट होईल. गोराईच्या मनोरी बीचवर सापडेलेले अगोदरचे जहाज हे एक व्यापारी जहाज असल्याचे समोर आले होते. हे जहाज उधाणलेल्या समुद्रात भरकटले होते. आता नव्याने सापडलेल्या जहाजात नेमके काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पहिल्यांदाच गोल्ड लोन घेताय? बँकेत जाण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
  • Pooja Bhatt : मुलगी वेडी झालीय..बॉयफ्रेंडसाठी पूजा भट्टने केलेली आयुष्यातील सर्वात मोठी चूक, वडिल महेश भट्ट दोन आठवडे तिच्यासोबत नव्हते बोलत
  • राजकारणातील चाणाक्यांना मोठा झटका; पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने तगडा उमेदवार उतरवला
  • महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, 5 जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी कोसळधारा सुरूच!
  • टीम इंडियाचा नवा हेड कोच; इंग्लंड मालिकेनंतर गौतम गंभीर नसणार! हा दिग्गज सांभाळणार धुरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in