• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Pune Train : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, तात्पुरत्या कालावधीसाठी अनेक रेल्वेगाड्या रद्द

July 9, 2026 by admin Leave a Comment


मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या किंवा पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा-कर्जत मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. तिन्ही मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान आणि आव्हानात्मक कामाची परिस्थिती लक्षात घेता, याला वेळ लागू शकतो. अचानक गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत होती, त्यामुळे एक वाजवी भूमिका घेऊन प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दिनांक 10 जुलै ते 17 जुलै कालावधीत दररोज धावणाऱ्या खालील गाड्या रद्द

  1. गाडी क्रमांक 17317 हुबळी – दादर एक्सप्रेस
  2. गाडी क्रमांक 17318 दादर – हुबळी एक्सप्रेस
  3. गाडी क्रमांक 22944 इंदूर – दौंड एक्सप्रेस
  4. गाडी क्रमांक 22943 दौंड – इंदूर एक्सप्रेस
  5. गाडी क्रमांक 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस
  6. गाडी क्रमांक 22731 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  7. गाडी क्रमांक 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
  8. गाडी क्रमांक 12123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन क्वीन
  9. गाडी क्रमांक 11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन एक्सप्रेस
  10. गाडी क्रमांक 11008 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस
  11. गाडी क्रमांक 12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
  12. गाडी क्रमांक 12128 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस
  13. गाडी क्रमांक 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल
  14. गाडी क्रमांक 22158 चेन्नई एग्मोर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट मेल

वेगवेगळ्या तारखांना सुटणाऱ्या खालील गाड्या रद्द

  1. गाडी क्रमांक 17411 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (दिनांक 10 जुलै ते 17 जुलै 2026 पर्यंत)
  2. गाडी क्रमांक 17412 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेस (दिनांक 9 जुलै ते 17 जुलै)
  3. गाडी क्रमांक 20495 जोधपूर – हडपसर एक्सप्रेस ((दिनांक 10 जुलै ते 17 जुलै 2026 पर्यंत)
  4. गाडी क्रमांक 20496 हडपसर – जोधपूर एक्सप्रेस (11 ते 17 जुलैपर्यंत)
  5. गाडी क्रमांक 11028 सातारा – दादर एक्सप्रेस (दिनांक 11, 13 आणि 14 जुलै)
  6. गाडी क्रमांक 11027 दादर – सातारा एक्सप्रेस (दिनांक 10, 12, 13 आणि 17 जुलैपर्यंत)
  7. गाडी क्रमांक 11041 दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस (दिनांक 9, 11, 14, 15, 15 जुलै)
  8. गाडी क्रमांक 11042 साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस (दिनांक 10, 12, 15, 16, 17 जुलै)

खालील विशेष गाड्या रद्द

  1. गाडी क्रमांक 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस (दिनांक 10 ते 17 जुलै पर्यंत)
  2. गाडी क्रमांक 01080 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक 12 जुलै ते 17 जुलै पर्यंत)
  3. गाडी क्रमांक 01415 पुणे – गोरखपूर एक्सप्रेस (दिनांक 10 ते 15 जुलै पर्यंत)
  4. गाडी क्रमांक 01416 गोरखपूर – हडपसर एक्सप्रेस (दिनांक 11 ते 16 जुलैपर्यंत)
  5. गाडी क्रमांक 01431 पुणे – गाझीपूर सिटी एक्सप्रेस (दिनांक 10 आणि 14 जुलै)
  6. गाडी क्रमांक 01432 गाझीपूर सिटी – हडपसर एक्सप्रेस (12 आणि 16 जुलै रोजी)
  7. गाडी क्रमांक 01491 पुणे – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (दिनांक 10 जुलै रोजी)
  8. गाडी क्रमांक 01492 हजरत निजामुद्दीन – पुणे एक्सप्रेस (दिनांक 11 जुलै रोजी)

सध्या रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मध्य रेल्वेची टीम अहोरात्र काम करत आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गाड्यांच्या धावण्याबाबतच्या माहितीसाठी, प्रवासी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात किंवा एनटीइएस ॲप तपासू शकतात. प्रवाशांच्या माहितीसाठी सोशल मीडियावरही वेळोवेळी अपडेट्स दिले जात आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या व्यत्ययाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती प्रवशांना करण्यात येत आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
  • राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह…
  • मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचे 3 आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकारणात नेमकं काय घडतंय?
  • शरद पवारांना मोठा धक्का बसणार? पक्षाच्या खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, शिंदेंची भेट घेताच…, राजकारणात मोठी खळबळ
  • निसानचा मोठा धमाका! 10.49 लाखांच्या सुरुवाती किंमतीत क्रेटाला देणार टक्कर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in