• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विवो कंपनीच्या ‘या’ स्मार्टफोन मॉडेल्सच्या वाढल्या किमती, जाणून घ्या

August 26, 2026 by admin Leave a Comment


विवो कंपनीने भारतात त्यांचे वाय-सिरीजमधील पाच स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या आहेत. तर या सिरीजच्या विवो वाय 51 प्रो 5जी च्या किमतीत सर्वात मोठी वाढ झाली आहे. कंपनीने त्यांच्या ऑनलाइन स्टोअरवर सर्व फोन्सच्या नवीन किमती अपडेट केल्या आहेत. ही दरवाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा जागतिक स्तरावर मेमरी आणि स्टोरेज चिप्सचा तुटवडा आहे. विवो व्यतिरिक्त, वनप्लस, ओप्पो आणि रियलमी यांनीही अलीकडेच त्यांच्या स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण स्मार्टफोनच्या किंमतीत किती वाढ झाली आहे ते जाणून घेऊयात.

Y51 Pro 5G आणि Y31 5G च्या नवीन किमती

8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Vivo Y51 Pro 5G मॉडेलची किंमत आता 30 हजार 999 रूपयांवरून 32 हजार 999 रूपये झाली आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेले मॉडेल आता 33 हजार 999 रूपयांवरून 37 हजार 999 रूपये इतकी झाली आहे. यासोबतच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Vivo Y31 5G मॉडेलची किंमत आता 25 हजार 999 रूपयांवरून 27 हजार 999 रूपये करण्यात आली आहे. 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेले मॉडेल आता 28 हजार 999 रूपयांवरून 31 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

Y21 आणि Y11 सुद्धा झाले महाग

Vivo Y21 आणि Y11 च्या किमतीतही वाढ झाली आहे. दोन्ही फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल्सची किंमती आता 22 हजार 499 रूपये आणि 20 हजार 999 रूपये झाली आहे. याचा अर्थ दोन्ही मॉडेल्स पूर्वीपेक्षा अधिक महाग झाले आहेत.

Y19s च्या किमतीतही मोठा बदल झाला आहे

Vivo Y19s च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची सुरुवातीची किंमत आता 14 हजार 999 रूपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 15 हजार 999 रूपयांपर्यंत आहे.
तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17 हजार 499 रूपये आहे. Vivo Y19s नोव्हेंबर 2025 मध्ये भारतात 10 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in