• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai News | मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

April 27, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील पायधूनी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया वय ४०, नसरीन डोकाडिया वय ३५ आणि त्यांच्या मुली आयशा वय १६ व झैनब वय १३ अशी करण्यात आली आहे. हे कुटुंब पायधूनीतील घाटी गल्ली परिसरातील मुघल इमारतीत राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने नातेवाईकांसह जेवण केले होते. त्यानंतर त्यांनी बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. जेवणानंतर काही वेळातच सर्वांना उलट्या, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला.
तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. डॉक्टरांनी प्रथम एका मुलीला मृत घोषित केले, त्यानंतर दुसऱ्या मुलीचा आणि काही वेळातच आई-वडिलांचाही मृत्यू झाला. या प्रकरणात अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आतड्यातील अन्नाचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Newly Married Couples साठी या चार गोष्टी महत्त्वाच्या, दुसरी गोष्ट कधीच विसरू नका, नाही तर…
  • LSG vs KKR सामन्यात मोठी चूक! सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे उडाला गोंधळ, 12व्या षटकात काय झालं?
  • रेल्वे स्टेशनचा बोर्ड पिवळ्याच रंगाचा का असतो? अजब लॉजिक वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
  • ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 4’चा ग्रँड फिनाले; कोण ठरणार विजेता? 6 स्पर्धकांमध्ये चुरस
  • टी लव्हर्स लक्ष द्या! दुधाचा चहा का टाळावा? हेल्थ एक्सपर्ट्सनी दिला मोठा इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in