• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेल्वे स्टेशनचा बोर्ड पिवळ्याच रंगाचा का असतो? अजब लॉजिक वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

April 27, 2026 by admin Leave a Comment


रेल्वे स्थानकावर अनेक चिन्ह, आकृत्या आणि दिशानिर्देश दिलेले बोर्ड असतात. या प्रत्येक चिन्ह आकृत्यांचा एक विशेष अर्थ असतो. सामान्यांना प्रवास सोपा व्हावा यासाठी हे नियम तयार केलेले असतात.

रेल्वे विभागात प्रवाशांना प्रवास तसेच रेल्वे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे रोजचे काम सोपे व्हावे यासाठी या नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. परंतु तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बोर्डावर असलेल्या पिवळ्या रंगाकडे कधी लक्ष दिले आहे का.

भारतातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्टेशनच्या नावाचा जो बोर्ड असतो, त्याला पिवळाच रंग दिलेला असतो. पिवळ्या रंगाच्या या बोर्डावर काळ्या रंगाने स्टेशनचे नाव दिलेले असते. यामागचे नेमके लॉजिक समजून घेऊ या…

पिवळा रंग हा इतर रंगांच्या तुलनेत लांबून जास्त दिसतो. या रंगाचा मनावर सकारात्मक प्रभाव पडतो. पिवळ्या बोर्डावर काळ्या रंगाची अक्षरे स्पष्ट आणि लांबूनच दिसतात. त्यामुळे प्रवाशांना अडचण होत नाही. म्हणूनच रेल्वे स्टेशनवर पिवळ्या रंगाचा बोर्ड लावलेला असतो.

पिवळ्या रंगाचा बोर्ड दिसताच रेल्वेचा चालक सतर्क होतो. रेल्वेचा वेग कमी करतो. तसेच प्रवाशांनाही आपण कोणत्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो याची लगेच माहिती मिळते. त्यामुळे स्टेशनच्या बोर्टासाठी पिवळ्या रंगाचे खूप महत्त्व असते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाईटचं मीटर तुफान पळतंय, या एका टेस्टने समजेल बिल का जास्त येतंय? नेमकी अडचण काय?
  • इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक?
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीतील फरार निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; निकालाकडे सर्वांचे लक्ष!
  • उन्हाचा पारा वाढला, टू-व्हीलर चालवणाऱ्यांनो उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी काय कराल?
  • मोठी बातमी! नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in