• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लाईटचं मीटर तुफान पळतंय, या एका टेस्टने समजेल बिल का जास्त येतंय? नेमकी अडचण काय?

April 27, 2026 by admin Leave a Comment


प्रत्येकाच्या घरात लाईटचे मीटर असते, मात्र काही लोकांना अनेकदा असे वाटते की, मीटर वेगाने पळत असल्यामुळे बिल जास्त येत आहे. तुमच्याही मनात ही शंका असेल तर एका सोप्या टेस्टद्वारे तुम्ही तुमचा संशय दूर करू शकता. यासाठी कोणतेही नवीन उपकरण खरेदी करण्याची गरज नाही. फक्त एका तासात तुम्ही तुमचे मीटर योग्य चालते की नाही हे तपासू शकता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

घरीच करू शकता टेस्ट

लाईट मीटरच्या या टेस्टला लोड टेस्ट किंवा 1kW टेस्ट असे म्हटले जाते. यासाठी अशा उपकरणाची गरज असते ज्याची वीज खपत नेमकी किती आहे हे माहित असते. उदाहरणार्थ, कूलरसारख्या उपकरणांची अचूक वीज खपत माहीत नसते, त्यामुळे त्यांचा वापर या टेस्टसाठी करू नये. त्याऐवजी हीटर किंवा बल्ब वापरू शकता.

टेस्ट कशी करायची?

सर्वप्रथम घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा. यात फ्रिज, टीव्ही, पंखे तसेच चार्जिंगला लावलेल्या वस्तूही बंद करा. यानंतर फक्त 1kW क्षमतेचा हीटर सुरू करा. तो सुरू करण्यापूर्वी मीटरची रीडिंग नोंद करून ठेवा. त्यानंतर हा हीटर सलग 1 तास चालू ठेवा. या काळात इतर कोणतेही उपकरण सुरू करू नका. एक तासानंतर पुन्हा मीटरची रीडिंग तपासा.

  • जर मीटरमध्ये 1 युनिट वाढले असेल तर मीटर योग्य चालत आहे.
  • जर 1 युनिटपेक्षा जास्त वाढले असेल तर मीटर वेगाने चालत आहे.
  • जर 1 युनिटपेक्षा कमी वाढले असेल तर मीटर कमी वेगाने चालत आहे.

1kW × 1 तास = 1 यूनिट असते. त्यामुळे तुम्ही ही स्टेस्ट घरीच करू शकता. या टेस्टदरम्यान लोड स्थिर असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हीटर हा सर्वात योग्य पर्याय मानला जातो. या टेस्टच्या माध्यमातून तु्म्ही मीटरबाबत तुमच्या मनात असलेली शंका दूर करू शकता. जर तुमचा मीटर वेगाने पळत असल्याचे आढळले तर तुम्ही तो बदलू शकता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत का? तुमच्या आर्थिक नियोजनावर होऊ शकतो वाईट परिणाम; जाणून घ्या सविस्तर
  • घाटकोपरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार,आरोपी सोडून घरच्यांना अटक, भाजप नेते पोलीस ठाण्यात, तब्बल 12 तास…
  • मुंबईत अभिनेत्रीला मारहाण, दात तुटला… चेहरा फोडला…, ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? Video Viral
  • Maharashtra News LIVE: विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडूंची शिवसेना नेत्यांसोबत बैठक
  • Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दिकी दादा कोंडके यांच्याबद्दल भरभरुन बोलला, म्हणाला त्यांचे चित्रपट हे नेहमीच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in