• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दिकी दादा कोंडके यांच्याबद्दल भरभरुन बोलला, म्हणाला त्यांचे चित्रपट हे नेहमीच..

April 28, 2026 by admin Leave a Comment


ETimes दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दिकी चित्रपटाबद्दलची त्याची मत, सह कलाकार यांच्याबद्दल व्यक्त झाला. नवाजुद्दीन सिद्दिकी मूळचा हिंदीतला अभिनेता. पण त्याला मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारे दादा कोंडके यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्याबद्दल तो मुलाखतीत भरभरुन बोलला.

नवाजुद्दीन सिद्दिकीला दादा कोंडके यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्याने थिएटरमध्ये पाहिलेला पहिला चित्रपट दादा कोंडके यांचा होता. मी थिएटरमध्ये पाहिलेला पहिला चित्रपट दादा कोंडके यांचा होता. मी त्यांचा मोठा चाहता आहे असं नवाजुद्दीन सिद्दिकीने सांगितलं.

दादा कोंडके यांनी नेहमीच वेगळ्या धाटणीचा अभिनय केला. त्यांच्या अभिनयात खोटेपणा नव्हता. सर्व काही ओरिजनल होतं. त्यांनी त्यांच्या चित्रपटातून वास्तव दाखवलं. त्यांचे चित्रपट काळाच्या पुढे होते अशा शब्दात नवाजुद्दीन सिद्दिकीने दादा कोंडके यांचं कौतुक केलं.

फ्रँकली सांगायचं झाल्यास मी थिएटरमध्ये पाहिलेला पहिला, दुसरा आणि तिसरा चित्रपट दादा कोंडके यांचा होता. मी त्यांचा मनापासून आदर करतो असं नवाजुद्दीन म्हणाला. दाद कोंडके नेहमीच माझे प्रेरणास्त्रोत राहिले आहेत असं नवाजुद्दीत म्हणतो.

नसरुद्दीन शाह माझे आवडते अभिनेते आहेत. आमिर खान सुद्ध मला आवडतो. तो त्याच्या चित्रपटात जे प्रयोग करतो, ती एक चांगली प्रॅक्टिस वाटते. त्याच्या फिल्मस टिपिकल बॉलिवूड चित्रपट वाटत नाहीत, तो सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो असं नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तू मला खुश कर, 10 दिवसांची सुट्टी देईन अन् पगारही… नराधम अधिकाऱ्याने महिलेवर हात टाकला, तब्बल 7 महिने…
  • ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारला भेटला खऱ्या आयुष्यातील विक्रांत सरंजामे; बांधली लग्नगाठ
  • तपास यंत्रणा हैराण, रात्री उशिरा रेल्वे ट्रॅकवर स्फोट, जवळच एका माणसाचा मृतदेह सापडतो.. रहस्यमयी घटनाक्रम
  • Bageshwar Baba: नागपूरला आलो की लफडा जरूर होतो… रामकथा कार्यक्रमात अखेर धीरेंद्र शास्त्रींनी…
  • Mira road Attack : ISIS, लोन वुल्फ, जिहाद, गाझा… आरोपीच्या नोटमधील मजकुराने मीरारोड हादरले, हा तर दहशतवादी हल्ला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in