• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LSG vs KKR सामन्यात मोठी चूक! सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे उडाला गोंधळ, 12व्या षटकात काय झालं?

April 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्ससमोवर 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं. पण लखनौचा संघ 155 धावा करू शकला त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये सुनील नरीनने तीन चेंडूतच लखनौचा गेम संपवला. पहिल्या चेंडूवर निकोलस पूरनला त्रिफळाचीत केलं. तर दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने एक धाव काढली आणि एडन मार्करम स्ट्राईक दिली. पण त्याची विकेट तिसऱ्या चेंडूवर गेली. त्यामुळे विजयासाठी फक्त दोन धावा आल्या. कोलकात्याकडून रिंकु सिंह मैदानात उतरला आणि पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि जिंकले. पण या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये जाण्याची गरजच नव्हती, असा वाद सोशल मीडियावर सुरू आहे. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने जिंकला होता. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावरील दाव्यानुसार, 12व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने षटकार मारला होता. पण पंचांनी निर्णय देताना चूक केली असा दावा केला जात आहे. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने मोठा फटका मारला होता. हा चेंडू थेट सीमेपार गेला. म्हणजेच षटकार गेल्याचा दावा केला जात आहे. पण पंचांनी षटकाराऐवजी चौकार दिला. त्यामुळे धावांची मोजणी करणाऱ्याने चौकार मोजला. तर व्हिडीओत ग्राफिक्सच्या माध्यमातून षटकाराची लांबी 63 मीटर दाखवली गेली. त्यामुळे सोशल मीडियावर षटकाराऐवजी चौकार दिल्याने लखनौचं नुकसान झालं.

Dear LSG management, in yesterday’s match at 11.1 over, Rishabh Pant clearly hit a six, but it was given as four by the umpire. Such decisions can change the result of the game. Hope this gets reviewed.” @DrSanjivGoenka pic.twitter.com/ynwvHtCTGg

— iamsurya (@iamsurya5656) April 27, 2026

पंचांच्या या निर्णयामुळे लखनौ सुपर जायंट्सचं 2 धावांचं नुकसान झालं. त्याची किंमत लखनौला पराभवातून मोजावी लागली. जर तसं झालं नसतं तर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेलाच नसता आणि लखनौने हा सामना जिंकला असता असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडलं आणि कोणाची यावरून सोशल मिडियात वाद प्रतिवाद सुरू आहे. दरम्यान, एका विशिष्ट कोनातून पाहिल्यास चेंडू न उसळता सीमारेषा ओलांडल्यासारखा दिसला. पण इतर कॅमेरा अँगलमधून दोरीच्या अगदी आधी उसळल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे षटकाराऐवजी चौकार देण्याचा पंचांचा निर्णय योग्य होता.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सच्या मानहानीकारक पराभवानंतर अक्षर पटेल वैतागला, सामना संपल्यानंतर म्हणाला…
  • विमानाचा मोठा अपघात, विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी ठार, कोणीच वाचले नाहीत….
  • ‘लग्न न करताही मुलं होतात’, 37 वर्षीय अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ, वैयक्तिक आयुष्यावर केलं मोठं विधान
  • वणव्यात मित्र गारव्यासारखा…, रशियाचा थेट भारतावर आलेल्या संकटाच्या मुळावरच घाव, पुतिन यांचा मोठा निर्णय
  • नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, 1 तारखेला पगार मिळणार नाही; समोर आले मोठे कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in