• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विमानाचा मोठा अपघात, विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी ठार, कोणीच वाचले नाहीत….

April 27, 2026 by admin Leave a Comment


विमानांचे अपघात अलिकडे वाढले असून आता दक्षिण सुदानमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण सुदानच्या राजधानीच्या बाहेरील भागात सोमवारी एका सेस्ना विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या भयंकर अपघातात विमानात बसलेले सर्वच्या सर्व १३ प्रवासी आणि पायलटचा मृत्यू झाला आहे. ही माहिती सुदानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने दिली आहे. प्राधिकरणाने हा विमान अपघात प्रथमदर्शनी खराब हवामानामुळे झाल्याचे सांगितले आहे. या विमानातील सर्वच्या सर्व नागरिक ठार झाले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कमी दृश्यमानतेमुळे झाला अपघात

नागरी उड्डयन प्राधिकरणाने माहिती देताना सांगितले की जुबा पासून सुमारे २० किलोमीटर ( १२ मैल ) अंतरावर स्थित अपघात स्थळावरुन माहिती मिळवण्यासाठी आणि मदतकार्यासाठी एक टीम पाठवण्यात आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या दुर्घटना स्थळाचा एक व्हिडीओत विमानाचा ढीगारा आगीच्या लोळांमध्ये घेरलेला दिसत आहे. व्हिडीओतील दाखवलेले स्थान डोंगराळ भागात असून धुक्याने भरलेले दिसत आहे. सध्या घटनास्थळावर आपात्कालिन सेवा पाठवण्यात आली आह आणि ढीगारा उपसण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या प्रकरणाची अधिक माहिती मिळण्याची वाट पाहीली जाते. या विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये दोन केनियाचे नागरिक आणि उर्वरित प्रवासी दक्षिण सुदानचे आहेत.

दिल्ली एअरपोर्टवर अपघात

अलिकडेच दिल्ली विमानतळावरुन ज्युरिच जाणारे स्विस इंटरनॅशनल एअर लाईन्सचे एक विमान उड्डाणाच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्युरिच जाणाऱ्या ए – 330 विमान एलएक्स – 147 च्या एका लँडींग गिअरच्या डाव्याबाजूने धुर येताना दिसल्याने चालक दलाने हे विमान उड्डाण घेण्याची प्रक्रिया थांबविली. त्यानंतर आपात्कालिन प्रक्रिया सुरु करण्यात आली. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘होणार सून मी..’ फेम पिंट्या लग्नाच्या 8 वर्षांनी झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्यांना जन्म
  • ऐन इराण युद्धात मणिपूर-मिझोरमच्या या लोकांची इस्रायलला रवानगी, थेट तेल अवीवमध्ये एण्ट्री ?
  • SAW vs INDW, 5th T20I : टीम इंडियाचा फायनलमध्ये 23 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1 ने मालिका विजय
  • घरात सतत पाल येतेय? ‘या’ घरगुती उपायाने निघून जाईल
  • 40 कोटी बजेट अन् कमाई 60 हजार, बॉलिवूडचा सर्वात मोठा प्लॉप चित्रपट, विकली फक्त 293 तिकिट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in