
लग्नानंतर नवरा बायको म्हणून दोघांना संसार करावा लागतो. संसारासाठीच्या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. आर्थिक ताळमेळ संतुलित ठेवावा लागतो. नाही तर घर खर्चाचं गणित बिघडतं. लग्नाच्या सुरुवातीचे काही महिने अत्यंत सुखाचे जातात. पण नंतर जबाबदारी स्वत: घ्यावी लागेत. त्यानंतर संसाराला लागणाऱ्या खर्चाचा अंदाज येतो. सुरुवातीला केलेली उधळपट्टी नंतर अंगाशी येते. त्यामुळे पहिल्यापासूनच आर्थिक नियोजनावर भर दिला पाहिजे. नाही तर सर्व गणित बिघडण्याची शक्यता असते. अत्यंत उत्साहात किंवा जोशात येऊन निर्णय घेऊन चालत नाही. डोकं शांत ठेवून आणि संयमाने निर्णय घ्यावे लागतात. ज्यांचं नुकतच लग्न झालंय त्यांनी खालील चार गोष्टींचं पालन केलंच पाहिजे. नाही तर आर्थिक चणचण वाट्याला आलीच म्हणून समजा.
कपल्सने पैसा कसा वाचवावा?
>> एक्स्ट्रा शॉपिंग –
लग्न ठरताच मुलं आणि मुली भरभरून शॉपिंग करत असतात. महागड्या साड्या आणि ड्रेस घेतले जातात. विशेष म्हणजे या महागड्या साड्या आणि ड्रेस वर्षभर कोणी घालत नाही. लग्नाच्या दिवशीच किंवा त्यानंतर एखाद दोन वेळाच काय ते हे कपडे परिधान केले जातात. नंतर ते कपाटात एका साईडला पडून असतात. मुलंही ब्रँडेड सूट आणि बूट घेतात. त्यावर हजारो रुपये खर्च करतात. काही लोक लाखो रुपयेही खर्च करतात. पण सहा महिन्यानंतर कपाट उघडल्यावर कळतं की यातील अर्ध्या गोष्टी वापरण्याच्या योग्यतेच्या राहिल्या नाहीत.
>> बडेजाव करू नका –
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. इन्स्टाग्रामवर भराभर रिल्स तयार केल्या जातात. फेसबुकवर फोटोंचा रतीब घातला जातो. त्यासाठी कपल्स महागड्या इंटरनॅशनल ट्रिप्सचा प्लान करतात. लोन घेऊन किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करून विदेशात जातात. खूप धमाल करतात. पैशांची उधळपट्टी करतात. पण सहा महिन्यानंतर मात्र हाच खर्च त्यांच्या अंगाशी येतो. कारण प्रत्येक महिन्याला कर्जाचा हप्ता भरावा लागतो. हप्ते भरून जीव नको नकोसा होतो. कारण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. त्यामुळे महागड्या ट्रिपला जाऊ नका. आपल्या बजेटमध्येच ट्रिपचा प्लान करा. बडेजाव केला तर तो नेहमी अंगाशीच येतो हे कायम लक्षात ठेवा.
>> ड्युप्लिकेट वस्तू घेऊ नका
नवीन संसार थाटण्याच्या नादात कपल्स नेहमी गरज नसलेल्या वस्तू घेतात. शो पीस, महागड्या क्रॉकरी आणि ज्यांचा वापर वर्षभरही केला जात नाही अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूही खरेदी केल्या जातात. अनेकदा तर स्वस्त मिळतंय म्हणून ड्युप्लिकेट वस्तूही खरेदी करण्यात येतात. या ड्युप्लिकेट वस्तूंना क्वॉलिटी नसते, त्यामुळे त्या तीन ते चार महिन्यातच खराब होतात.
>> बाहेरचं खाणं…
अनेकांना तर बाहेरच्या खाण्याची भार हौस असते. बाहेर ऑर्डर देऊन अन्न पदार्थ मागवले जातात. विकेंड पार्टीच्या नावाने पैशाची उधळपट्टी केली जाते. सिनेमा पाहायला जाणं आणि बाहेरचं खाणं यामुळे खिशाला मोठी कात्री बसते.
हे करा, म्हणजे बजेट वाचेल
० बजेट डायरी – एक बजेट डायरी तयार करा. महिन्याचा किती खर्च येईल आणि किती बचत होईल याची यादी तयार करा. त्यामुळे तुम्हाला खर्चाचा अंदाज येईल.
० गरज – तुमची गरज काय आहे? हे ओळखा. कोणत्याही वस्तू घेताना याची गरज आहे का? याच्या शिवाय काम अडून राहते का? हे दोन प्रश्न मनाला विचारा. त्यातून जे उत्तर येईल त्याला फॉलो करा.
० गुंतवणूक – बडेजाव करण्यासाठी पैशाची उधळपट्टी करण्याऐवजी चांगली गुंतवणूक करा. बचत झाली तर त्याचा पुढे उपयोग होईल.
Leave a Reply