• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai News: आमिर खानला धमकी ते लॉरेन्स बिश्नोई गँगपर्यंत, मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा, हाती लागले महत्त्वाचे धागेदारे?

September 5, 2026 by admin Leave a Comment


बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी जीशान अख्तर याच्याकडून अभिनेता आमिर खान याला कथित धमकीप्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपी हे VOIP च्या माध्यमातून कॉल करत आहेत. आमिर खान याला धमकावणारे फोन कॉल हे खोटे आहेत की खरे याचाही पोलीस तपास करत आहेत. विधान परिषदेचे आमदार जीशान सिद्दीकी यांना अगोदरच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मुंबई पोलीस याप्रकरणाचा कसून चौकशी करत असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिली.

लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला ताब्यात घेण्याची तयारी पोलीस करत आहेत. न्यायालयाचा त्याच्याविषयीचा आदेश रद्द होईपर्यंत पोलिसांना वाट पाहावी लागणार आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डविरोधात पोलिसांची सातत्याने कारवाई सुरू आहे. यामुळे मुंबईत त्यांच्या कारवाया थांबल्याचा पोलिसांचा दावा आहे. जीएन साईबाबा याच्या स्मृतिदिनी TISS मध्ये कथित नारेबाजी झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर एक आरोपीला अंतरिम जामीन मिळाला आहे.

दिशा सालियान प्रकरणात मुंबई पोलिसांची भूमिका काय?

दिशा सालियान प्रकरणात कोर्टाच्या आदेशना CBI कडे तपास सोपवण्यात आला आहे. कोर्टाने काय आदेश दिला त्यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी कोणतीही टिपप्णी करण्यास नकार दिला. तर सीबीआयने आतापर्यंत मुंबई पोलिसांशी या प्रकरणात कोणताही संपर्क केला नसल्याची माहिती दिली.

DJ प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशाचे पालन

DJ प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात येईल असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. मुंबईत डीजेसाठी वेगळी परवानगी मागण्यात येत नाही. पण मंडळांना निश्चित केलेल्या डेसिबलची पातळी ओलंडता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे मुंबई पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

इतक्या बांगला देशी नागरिकांवर कारवाई

मुंबई पोलीस आयुक्तानुसार 2024 मध्ये 326, 2025 मध्ये 1,161 आणि यावर्षी 2026 मध्ये आतापर्यंत 1,066 बेकायदेशीररित्या मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईत डिपोर्टेशन डिटेंशन सेंटर पण सुरू करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bart De Weve : पंतप्रधान मोदींनी खूप आधीच आम्हाला धोक्याबद्दल अलर्ट केलेलं पण आम्हीच..बेल्जियमच्या पंतप्रधानांकडून चूक मान्य
  • सर्वात मोठी बातमी ! संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?
  • हुश्श, जगाची एका युद्धातून सुटका? युक्रेनच्या राष्ट्रपतींकडून मोठा प्रस्ताव, पुतीन यांच्याकडे सर्वांच्या नजरा
  • Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
  • Manoj Jarange Patil: मोठी बातमी ! मनोज जरांगे पाटील यांचा काळजाचा ठोका चुकवणारा निर्णय… पाणी, सलाईन आणि… चिंता वाढली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in