• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bart De Weve : पंतप्रधान मोदींनी खूप आधीच आम्हाला धोक्याबद्दल अलर्ट केलेलं पण आम्हीच..बेल्जियमच्या पंतप्रधानांकडून चूक मान्य

September 5, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप आधीच सर्तक करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने नुकसान झाल्याचं बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांनी मान्य केलं आहे. काही देशांवर आर्थिक आणि रणनितीक दृष्टीने अवलंबून राहण्याचा युरोपियन देशांचा निर्णय चुकीचा ठरला. त्यात उलट त्यांचचं नुकसान झाल्याचं बार्ट डी वेवर यांनी सांगितलं. खूप आधीच मोदींनी या बद्दल युरोपला सतर्क केलं होतं. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. आता युरोपला त्यांच्या म्हणण्याचं महत्व लक्षात येतय असं वेवर यांनी सांगितलं. ही जागरुकता उशिराने येतेय. पण आम्ही आता चांगले आणि प्रामाणिक भागीदार शोधत आहोत असं बार्ट डी वेवर म्हणाले. बेल्जियमचे पंतप्रधान दिल्लीत भारतीय उद्योग समूहाच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते.

युरोपने दीर्घकाळ स्वस्तात मिळणाऱ्या परदेशी सामानाला आपल्या इथे येण्याची बिझनेसची परवानगी दिली. कमी किंमतीत मिळणाऱ्या या युरोपियन सामानाने हळूहळू युरोपियन कंपन्यांच्या अडचणी वाढवल्या आणि त्यांना कमकुवत केलं. वेवर यांनी कुठल्या देशाचं नाव घेतलं नाही. पण त्यांचा इशारा चीनकडे होता. युरोपला कुठल्या देशाच्या सामानासाठी डंपिग जोन बनू देणार नाही. युरोपला हे कडवं सत्य आता समजलं आहे. भारताने वेळोवेळी युरोपला या बद्दल सर्तक केलं होतं. पण त्यावेळी ही गोष्ट युरोपच्या लक्षात आली नाही.

दबाव टाकण्याऐवजी सन्मानाने सहकार्य करेल

वेवर यांनी अमेरिकेचं नाव घेतलं नाही. ते म्हणाले की, “युरोपला असा भागीदार हवाय जो दबाव टाकण्याऐवजी सन्मानाने सहकार्य करेल. एक दिवस टॅरिफ लावायचा आणि दुसऱ्यादिवशी हटवायचा. आपली एखादी गोष्ट पटली नाही की पुन्हा टॅरिफ लावायचा असा सहकारी नको” जर, तुम्हाला एका मोठ्या अर्थव्यवस्थेला सोबत जोडायचं आहे आणि त्या यादीत भारताचं नाव नसेल तर तु्म्ही काही तरी गमावत आहात. युरोपियन परिषदेच्या बैठकीत सर्व मुद्यांवर चर्चा होत आहे. आम्ही अशा सहकाऱ्याच्या शोधात आहोत, जो आमच्यासारखाच असेल, ज्याचा बहुपक्षवादावर विश्वास असेल असं वेवर म्हणाले.

फटका युरोपियन देशांना

युरोपियन बाजारपेठ आज चीनने पूर्णपणे काबीज केली आहे. चीन युरोपला 560 अब्ज युरोचं सामान निर्यात करतो. यात इलेक्ट्रॉनिक्स, मशीनरीचा प्रामुख्याने समावेश आहे. तेच युरोपकडून चीनला फक्त 200 अब्ज सामानाची निर्यात होते. म्हणजे युरोप आणि चीनच्या व्यापारात मोठ्या प्रमाणात असंतुलन आहे. त्याचा फटका युरोपियन देशांना सहन करावा लागतोय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
  • Gulabrao Patil : भाजपवाले पक्ष फोडतात, तुम्हीही विद्यार्थी फोडा! गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला
  • माझे व्हिडीओ म्हणजे सोशल सर्व्हिस, पुरुषांचा ताण कमी होतो, पूनम पांडेच्या वक्तव्याने खळबळ
  • Kangana Ranaut : तुम्ही तर माझ्यापेक्षा पण चांगला अभिनय करता हो, फालतूमध्ये..बैठकीत कंगना रणौतने चांगलचं सुनावलं
  • Pimpri Chinchwad Dahi Handi Death : दहीहंडीची कमान अंगावर पडली अन्…; पिंपरी चिंचवडमध्ये दुर्घटना कशी घडली, सलमा यांच्या मृत्यूचं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in