• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल दीड तास उशिराने

May 24, 2026 by admin Leave a Comment


ऐन रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा कोलमडली आहे. कसारा-कल्याण मार्गावरील खडवली स्थानकात आज पहाटेच अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. या बिघाडामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक तब्बल एक ते दीड तास उशिराने सुरु आहे. यामुळे सकाळच्या सत्रात घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास खडवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणारी लोकल वाहतूक पूर्णपणे कोलमडली. यामुळे कल्याण, कसारा या मार्गावरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल धीम्या गतीने सुरू आहेत. यामुळे रविवार असूनही अत्यावश्यक कामासाठी आणि सुट्टीच्या दिवशी बाहेर पडलेल्या प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागत आहे.

या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर परिणाम झाला आहे. सध्या फास्ट आणि स्लो अशा दोन्ही लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी लागोपाठ गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

बातमी अपडेट होत आहे….



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in