• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी… मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?

July 16, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत धावत्या लोकलमध्ये बुधवारी (15 जुलै) रात्री प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचे रूप मोठ्या राड्यात बदलले. कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. सीटवर बसण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले आणि त्यानंतर हाणामारी झाली. या घटनेत तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये प्रीतेश कोनोजिया (38), साहिल खंदारे (19) आणि राजू वाघे (19) यांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या राड्यात लोखंडी कड्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे काही प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.

घटनेनंतर जखमींना तातडीने कल्याणमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून संबंधित प्रवाशांचा शोध घेतला जात असून घटनेमागील नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in