• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?

July 27, 2026 by admin Leave a Comment


एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. यापूर्वी परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता. या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आता या प्रकरणातील तक्रारच खोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससीकडे पाठवण्यात आलेल्या नव्या ईमेलमध्ये औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅपवर फिरणारी प्रश्नपत्रिका ही एमपीएससीच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी संबंधित नसून ती एका टेस्ट सिरीजमधील प्रश्नपत्रिका असल्याचं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

गौरव पाटील आणि लोकेश पाटील यांनी एमपीएससीला पाठवलेल्या ईमेलमध्ये, 20 मार्च रोजी व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका ही आयोगाच्या 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक परीक्षेची नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सुरुवातीला ती आयोगाची मूळ प्रश्नपत्रिका असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर अधिक तपासात तो दावा चुकीचा असल्याचं समोर आल्याचं त्यांनी नमूद केलं.

ईमेलमध्ये असंही म्हटलं आहे की, सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका ही प्रत्यक्षात एका खासगी टेस्ट सिरीजची होती. आयोगाची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, या माहितीचा विपर्यास करून एमपीएससीचा पेपर फुटल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, संबंधित तक्रारदाराने स्वतः परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्यात यावी या उद्देशाने पेपरफुटीची अफवा पसरवल्याचाही उल्लेख ईमेलमध्ये करण्यात आला आहे. तसेच आयोग, त्याचे सचिव किंवा अध्यक्ष यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचंही ईमेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, या नव्या घडामोडीनंतर एमपीएससी पेपरफुटीबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी संबंधितांवर आयोग कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in