• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MPSC पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्री कार्यालयापर्यंत? नरहरी झिरवळांचे कार्यालय पुन्हा का चर्चेत?

September 5, 2026 by admin Leave a Comment


गौतम भैसाणे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातंर्गत औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला होता. याप्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. अगोदर लव्ह अँगल नंतर हेट स्टोरी समोर आल्यानंतर आता थेट मंत्री नरहरी झिरळव यांच्या अन्न आणि औषधी मंत्रालयापर्यंत या पेपरफुटीचे धागेदोरे तर नाहीत ना? यादृष्टीने तपासाची चक्र फिरली आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अगोदरच या मंत्रालयाची लाच प्रकरणात मोठी बदनामी झाली होती. आता पेपरफुटीप्रकरणातही या मंत्रालयाशी संबंधित एकाची चौकशी करण्यात आली आहे.

मंत्री झिरवळ यांच्या OSD ची चौकशी

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी गौरव पाटील यांच्या घरात मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) गेल्या तीन वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. गणेश देवरे हे आरोपी गौरव पाटील यांच्या घरात राहत असल्याने पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत आहेत का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे यांची मुंबई विशेष शाखेच्या पथकाकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासात काय आले समोर?

ज्या विभागाचा पेपर फुटला, त्याच विभागाच्या मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी आरोपीच्या घरात भाडेकरू असल्याने अनेक संशय उपस्थित होत आहेत. गणेश देवरे हे गेल्या तीन वर्षांपासून आरोपी गौरव पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. गणेश देवरे हे कृषी विभागाच्या माध्यमातून मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहत असल्याचे समजते.

सर्व आरोपी एकाच कॉलनीतील?

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांचा आणि परिचितांचा गोतावळा समोर येत असताना, गणेश देवरे यांचाही आरोपी गौरव पाटील यांच्याशी जवळचा संबंध असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. आरोपी ऋतुजा पाटील, अमृत पाटील, गौरव पाटील आणि मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे हे सर्व नंदुरबारमधील एकाच कॉलनीतील रहिवासी असल्याने संशयाला बळ मिळाले आहे.

आयोगाच्या कार्यालयाच्या आवारात व्यवहार?

औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणात प्रश्नसंचाच्या बदल्यातील पैशांचा व्यवहार थेट आयोगाच्या कार्यालयाच्या आवारातच झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग लॉबीमध्ये पाच लाख रुपये देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आयोगाच्या गोपनीय कक्षात उपलब्ध प्रश्नांपैकी 294 प्रश्नांचा स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्यात आला. अधिकारी विश्वेश्वर नकाते याने हा प्रश्न गोपनीय कक्षातून बाहेर काढून झेरॉक्स केल्याचा आणि त्यानंतर लॅपटॉपवर टाईप करून प्रश्नसंच तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. नकाते याने हा प्रश्नसंच अवर सचिव अभिजीत लेंडवे याच्याकडे दिला. पुढे तो कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि तिथून तो प्रवीण पाटीलकडे देण्यात आल्याचे समोर आले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘छपरी, गुंडा…’ या हिंदुत्ववाद्यावर भडकले AIMIM नेते वारिस पठाण, CJP वरून असा साधला निशाणा
  • नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावा, पेपर फुटी प्रकरणी संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी
  • Suraj Chavan: सूरज चव्हाण झाला बाबा! घरी चिमुकल्या ‘गुलिगत स्टार’चं आगमन
  • मुंबईत दहीहंडीच्या उत्सवात ‘राजकीय काला’; मनसे नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?
  • Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in