
बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. आता सूरज चव्हाणच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी सूरज चव्हाणच्या घरात गोडगोडुली राधा आली आहे. सूरजा कन्यारत्न प्राप्त झाले आहे. 'गुलिगत स्टार'च्या आगमनाने सूरज चव्हाणचे कुटुंबिय आनंदी असल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी सूरज चव्हाणवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
डिसेंबर 2025मध्ये सूरजने संजनाशी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांमध्ये जान्हवी किल्लेकरने संजनाची चोर ओटी भरली होती. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गूड न्यूज दिली होती.
आता सूरजच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्याचे दिसत आहे. हॉस्पिटलमधील सूरजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो बायको संजना आणि लेकीसोबत दिसत आहे.
सूरज चव्हाणच्या एका फॅननं रुग्णालयातून व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज संजनाच्या डोक्यावरुन हात फिरवताना दिसत आहे.




Leave a Reply