• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘छपरी, गुंडा…’ या हिंदुत्ववाद्यावर भडकले AIMIM नेते वारिस पठाण, CJP वरून असा साधला निशाणा

September 5, 2026 by admin Leave a Comment


Warish Pathan on Swatantra Bhardwaj: AIMIM चे नेते वारिस पठाण हे स्वतंत्र भारद्वाज यांच्याविरोधात आक्रमक झाले. त्यांनी CJP च्या FIR च्या मागणीवरून दिल्ली पोलिसांना सवाल केला. स्वतंत्र भारद्वाज यांनी अनेकदा वक्तव्य केले आहे की, त्यांनी दगडफेक केली आहे. तरीही त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होत नाही, असे म्हणत त्यांनी भारद्वाज यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली.

भारद्वाजविरोधात लवकर कडक कारवाई व्हावी

वारिस पठाण म्हणाले की, स्वतंत्र भारद्वाज यांनी अनेकदा वक्तव्य केले आहे की, त्याने दगडफेक केली आहे. तरीही त्यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. सीजेपीने सुद्धा भारद्वाज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भारद्वाज यांच्याविरोधात तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी पठाण यांनी केली. एक छपरी गुंडा एका पॉडकास्टमध्ये जातो. तो जाहिररित्या जंतरमंतरवरील कृत्याची कबुली देतो. सीजेपीच्या आंदोलनात अनेक विद्यार्थी हे घटनात्मक मार्गाने प्रदर्शन करत होते. त्यात अनेक मुली होत्या. त्यांचे पालक आले होते. त्यांचे आपण डोके फोडले, एका पोलिसांचा बुट आपल्याकडे असल्याची माहिती भारद्वाज या पॉडकास्टमध्ये जाहीरपणे देत असल्याचे पठाण म्हणाले.

मुलीला धमकी, पोलीस काय करत आहे?

या आंदोलनात सहभागी एका मुलीला धमकी येते. Gen Z विद्यार्थीनी आहे. ती प्रदर्शन करत होती. तिचे वडीलही होते. ते SC-ST प्रवर्गातील आहे. त्यांच्याविषयी अपशब्दांचा वापर करण्यात आला. अनेक जण त्यांना धमकावणाऱ्या पोस्ट करत आहेत. माझा प्रश्न असा आहे की, जाहिररित्या धमकावण्यात येत आहे. मग पोलीस काय करत आहेत असा सवाल त्यांनी केला. पोलिस त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दोन मुस्लिम महिला पत्रकारांना मारल्याचा दावा

वारिस पठाण यांनी दोन मुस्लिम महिला पत्रकारांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. एका वृत्तवाहिनीच्या दोन मुस्लिम महिला पत्रकारांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर सवाल उपस्थित करताच त्यांना मारहाण झाल्याचा दावा केला. जेव्हा त्या मुस्लिम असल्याचे समोर आल्यावर अशी वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना मारहाण आणि जे खुलेआम धमकी देत आहेत, दगडफेक केल्याचे सांगत आहेत, त्यांच्यावर साधा एफआयआरही नाही असा दावा त्यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gautami Patil: ती आली… तिने पाहिलं… पण नाचली नाही, तुफान गर्दी असूनही गौतमी पाटील आली तशी गेली, दहीहंडीत असं काय घडलं?
  • धमकीला भीक न घालता… शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
  • Dahihandi 2026 : ठाण्यात संस्कृतीच्या दहीहंडीत लागले 9 थर, ते पाहून सूर्यकुमार यादव म्हणाला…
  • Dahi Handi 2026 : ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम; तरुणाईचा उत्साह शिगेला, मुख्यमंत्र्यांसह सेलिब्रिटी दहीहंडीत
  • उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून… ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in