• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Monsoon Update : या तारखेलाच महाराष्ट्रात धो धो पाऊस, जूनमध्ये मॉन्सूनचा पाऊस नाहीच, थेट आता..

June 21, 2026 by admin Leave a Comment


राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा अजूनही काहीच पत्ता नाही. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला. विदर्भातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्णतेचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबईसह राज्यात मॉन्सून अद्याप दाखल झाला नाही. मॉन्सूनची वाटचाल ठप्प आहे. 8 जूनलाच कोकणासह राज्यातील काही भागात मॉन्सून दाखल झाला होता. मात्र, त्याची पुढे काहीच वाटचाल नाही. मॉन्सूनची काही प्रगती नसल्याने राज्यावर संकट आहे, पेरण्या रखडल्या आहेत. जमुई, सोलापूर, हरणई, हैद्राबाद, कोरापुट, भद्राचलम, रांची, फुलबनी या भागात मॉन्सूनची सीमा होती. पुढे सरकण्यासाठी मॉन्सूनला पोषक वातावरण मिळत नसल्याने तो एकाच ठिकाणी रखडला आहे.

अरबी समुद्रात मॉन्सूनची अजिबातच पुढे वाटचाल होत नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली. जून महिना पूर्ण कोरडा जाण्याचा अंदाज काही हवामान तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. जुलै महिन्यात मॉन्सूनचा पाऊस येऊ शकतो, असा अंदाज आहे. झारखंड, ओडिसा, तेलंगणा, बिहार या राज्यात आज मॉन्सून पुढे सरकण्याचा अंदाज आहे.

यंदा राज्यात पाऊस कमी होणार हे स्पष्ट आहे. मात्र, जून महिना संपत आला तरीही पावसाचा थांग पत्ता नाही. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आज हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. मॉन्सून 15 जूनलाच राज्यात दाखल होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज 21 जून असूनही मॉन्सूनचा पाऊस आला नाही.

त्यामध्येच जून महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढत आहे. पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. अनेक भागात पाणीकपात सुरू झाली. मॉन्सूनची स्थिती जैसे थेच आहे. जुलै महिन्यात राज्यभरात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. यासोबतच एल निनोचे देखील संकट उभे आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. त्याचाही परिणाम पावसावर होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?
  • ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
  • 6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in