• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mohammad Irfan : CJP च्या आंदोलनातला गर्दीतला एक चेहरा मोहम्मद इरफान इतका वेगाने का लोकप्रिय होतोय? त्याची स्टोरी वाचून तु्म्ही थक्क व्हालं

July 28, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने केलेलं आंदोलन यशस्वी ठरलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची त्यांची मागणी पूर्ण झाली. हे आंदोलन संपल्यानंतर आता कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा मोहम्मद इरफान याची सर्वात जास्त चर्चा आहे. दिवसा मजुरी करुन घरखर्च भागवणाऱ्या इरफानच्या एका इंटरव्यूने कमाल केली आहे. सोशल मीडियावर हा इंटरव्यू मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाहता, पाहत मोहम्मद इरफान देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोहम्मद इरफानच्या घरी गेल्यानंतर त्याची अजून चर्चा सुरु झाली. या भेटी दरम्यान राहुल गांधी यांनी आपली बहिण प्रियंका गांधीला फोन लावला व इरफानचं त्यांच्याशी बोलणं घडवून आणलं. या चर्चेत प्रियंका गांधी मस्करीत, चेष्ठेने राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल बोलल्या.

राहुल गांधी घरी येण्याआधीच मला प्रियंका गांधींचा फोन आला होता, असं मोहम्मद इरफानने ‘द लल्लनटॉप’ शी बोलताना सांगितलं. त्यांनी मला, राहुल गांधींना तू लग्न करायला सांग, असं सांगितलं. कारण राहुल गांधी त्यांचं ऐकत नाहीत. जंतर-मंतरवर मागच्या महिन्याभरापासून सीजेपीचं आंदोलन सुरु होतं. 20 जुलै रोजी संसदेवर काढलेल्या मार्च दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर हे आंदोलन अधिक प्रसिद्धीच्या झोतात आलं.

काही मिनिटातच या इंटरव्यूने लाखो लोकांचं लक्ष वेधलं

‘द लल्लनटॉप’ चे पत्रकार रजत पांडे तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी बोलत होते. त्याचवेळी निळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलेल्या मोहम्मद इरफान जवळ ते पोहोचले. त्यांच्याशी संवाद साधला. काही मिनिटातच या इंटरव्यूने लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतलं. लोकशाही, संविधान, मजुराचे अधिकार आणि सन्मानजनक जीवन यावर इरफानने अगदी सहजतेने आपले विचार मांडले. त्यामुळे इरफानला सोशल मीडियावर नव्याने ओळख मिळाली.

फार शिक्षण नाही पण समज थक्क करणारी

रजत पांडे इरफानच्या मुलाखतीबद्दल म्हणाला की, पत्रकारितेच्या करिअरमधील हा कायम लक्षात राहणारा इंटरव्यू आहे. इरफान त्या मुलाखतीत जे बोलला ते पुस्तकातून तो शिकलेला नाही. आयुष्याच्या अनुभवातून आलेले ते धडे आहेत. इंटरव्यूमध्ये इरफान कुठेच थांबला नाही. कुठल्याही तयारीशिवाय तो आपलं म्हणणं मांडत गेला. म्हणूनच तो व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. 35 वर्षाचा इरफान दिल्लीच्या सावदा जेजे कॉलनीमध्ये राहतो. तो कधी नियमित शाळेत गेला नाही. अंगणवाडी केंद्रापर्यंतच त्यांचं शिक्षण झालं आहे. तो आजही व्यवस्थित वाचू-लिहू शकत नाही. मोबाइलवर टाइपही करत नाही. मात्र, तरीही संविधान, लोकशाही, श्रम कायदा आणि सामाजिक मुद्दावरील त्यांची जी समज आहे, ती पाहून खरोखरच लोकं थक्क झाले.

माझं विद्यालय गुगल, युट्यूब आणि इंटरनेट

इरफान म्हणाला की, “मी जे शिकलो, ते इंटरनेटवरुन शिकलो. गुगल वॉइस सर्चचा तो वापर करतो. युट्यूबवर व्हिडिओ ऐकतो. तिथूनच वेगवेगळ्या विषयाची माहिती मिळवतो” तो गंमतीने म्हणतो की, “माझं विद्यालय गुगल, युट्यूब आणि इंटरनेट आहे. त्याच माध्यमातून मी संविधान, लोकशाही आणि सामाजिक मुद्दे समजून घेण्याचे प्रयत्न केले”

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पोस्ट ऑफिसमधील PPF, SSY आणि SCSS खाती बँकेत ट्रान्सफर करता येतात का? जाणून घ्या पोस्टाचा अधिकृत नियम
  • ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?
  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in