• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?

August 25, 2026 by admin Leave a Comment


भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या मागे दुखापतीचा ससेमिरा लागला आहे. गेल्या काही वर्षात त्याला दुखापतीने ग्रासलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पु्न्हा एकदा त्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी आणि त्याच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराचा आखुड टप्प्याचा चेंडू खेळताना त्याच्या डाव्या मनगटावर जोरात लागला. त्यामुळे प्रचंड वेदनेने कळवळला. त्यामुळे फिजिओने तात्काळ मैदानात धाव घेतली आणि त्याची तपासणी केली. हा प्रकार घडला तेव्हा ऋषभ पंत 3 धावांवर खेळत होता. अखेर तपासणीनंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतावं लागलं. पहिल्या दिवशी झालेल्या दुखापतीनंतर दुसऱ्या दिवशी वेदनाशामक औषधं घेऊन ऋषभ पंत पुन्हा मैदानात उतरला. यावेळी त्याने 89 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 63 धावांची खेळी केली. पण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही.

ऋषभ पंतला नेमकं झालंय तरी काय?

फलंदाजी केल्यानंतर ऋषभ पंतला खांद्याचा त्रास आणखी वाढला. खबरदारी म्हणून भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला क्षेत्ररक्षणास उतरवलं नाही. त्याच्या ऐवजी पहिल्या डावात विकेटकिपींग ध्रुव जुरेलने केली. त्याच्या दुखापतीवर भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी स्पष्ट केलं की, पंतच्या दुखापतीवर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. लवकरच पूर्णपणे तंदुरूस्त होईल असं त्याने सांगितलं. असं असताना त्याचा एक फोटो समोर आला आहे. यात ऋषभ पंतच्या उजव्या खांद्यावर निळ्या रंगाचा एडव्हान्स्ड आइस काँप्रेसन रॅप बांधला आहे. खांद्याला झालेली अंतर्गत दुखापत आणि सूज कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.

Get well soon, Rishabh Pant 🤞🇮🇳 pic.twitter.com/DKViQyR4Vq

— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2026

ऋषभ पंत आणि दुखापत

ऋषभ पंत आणि दुखापत याचं समीकरण जुळून आली आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी अपघातामुळे मोठी दुखापत झाली होती. तेव्हा उजव्या गुडघ्याचे लिगामेंट तुटले होते. त्यानंतर 14 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यानंतर 2025 इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झालं होतं. तेव्हा दुखापतीमुळे मैदानात चालूही शकत नव्हता. ख्रिस वोक्सचा चेंड़ू लागला होता. त्यानंतर सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला गेला होता. जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सराव करताना कमरेच्या वरच्या भागात लागलं होतं. त्यामुळे मालिकेला मुकला होता.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in