
Sandeep Deshpande on CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी परवा दिल्लीत लाठीहल्ला केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. पोलिसांच्या कृतीवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी रान उठवले आहे. काल शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांनी उपोषणस्थळी धाव घेत आंदोलकांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे.
यांच्यापेक्षा ब्रिटिश बरे
जे आंदोलन करत आहे, त्यांचा ऐकून घेतलं पाहिजे. आपल्या घरी देखील मुले चिडतात, मग आपण त्यांना लाठ्यांनी मारत नाही. त्यांच्याशी बोलतो. त्यांचा काही दु:ख ते ऐकून घेतो. हे सरकार दडपशाही आणि हुकूमशाही आहे. तुम्ही हिटलर पेक्षा बत्तर झालेले आहात. ब्रिटिश उपोषण कर्त्यांना भेटायला तरी जायचंय मात्र हे सरकार बत्तर सरकार आहे, अशी जोरदार टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. एरवी तुम्ही मन की बात करताना मग आता काय झालं असा सवाल त्यांनी केला.
आज आझाद मैदानात आंदोलन
आम्ही देखील या सरकार विरोधात आज आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. महानगरपालिका बोलते की झाड पडून एका मुलाचा मृत्यू झाला यात दोष कोणाचाच नाही का, असा सवाल करत त्यांनी आज आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.
ही हुकूमशाही चालणार नाही
या आंदोलनाला विरोधकांचा मोठा पाठिंबा मिळतोय. राज ठाकरे यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ही हुकूमशाही चालणार नाही. उद्धव ठाकरे देखील जंतरमंतर या ठिकाणी गेले होते. इतर नेतेही तिथे पोहचले. सर्व विरोधक आणि सत्ताधारी यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे ही मुलं आपली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या आंदोलन ठिकाणी जाणार आहेत की नाही, याचा निर्णय ते घेतली असे संदीप देशपांडे म्हणाले.
डायर नाही कायर पाहिला
काल संदीप देशपांडे यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. जालियनवाला बाग हत्याकांड घडवणारा जनरल डायर आम्ही पाहिला नाही. पण जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनानंतर कायर पाहिला अशी जहरी टीका देशपांडे यांनी केली होती. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर मोठा आक्षेप घेतला होता.
Leave a Reply