• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Melody : मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या ‘मेलोडी’ची कहाणी, कोण आहे मालक, संपत्ती किती?

May 23, 2026 by admin Leave a Comment


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची रोममधील भेट देशभरात सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. ही भेट केवळ राजनैतिक चर्चेपुरती मर्यादित नव्हती. तर या भेटीत एक असा गोड क्षणही होता, ज्याने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नरेंद्र मोदी हे मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध चॉकलेट ‘मेलोडी’ भेट देतानाचा हा तो क्षण होता. या क्षणाचा व्हिडिओ जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताच वाऱ्याच्या वेगाने तो व्हायरल झाला. मोदी आणि मेलोनी यांच्या या व्हिडीओवर आणि ‘मेलोडी’च्या गोड भेटीवर सोशल मीडियावर आणि राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘मेलोडी इतनी चॉकलेटी क्यूँ है’ ही टॅगलाईन तुम्ही ऐकलीच असेल. नव्वदच्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला हे फक्त चॉकलेटच नव्हतं तर भारतीय पॉप कल्चरचा एक भाग बनलं होतं. देशात फार क्वचितच तुम्हाला एखादी व्यक्ती सापडेल, ज्याने आजवर या चॉकलेटची चव चाखली नसेल.

मेलोडी चॉकलेट

मेलोडी हे देशातील प्रसिद्ध पार्ले कंपनीचं अत्यंत लोकप्रिय चॉकलेट आहे. बाहेरून कॅरेमल आणि आतून चॉकलेटची चव असलेली ही टॉफी भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आणि परवडणाऱ्या चॉकलेट्सपैकी एक आहे. एकेकाळी या मेलोडी चॉकलेटची किंमत फक्त 50 पैसे होती, पण आजही हे चॉकलेट फक्त एक रुपयाला मिळतं. कमी किंमत आणि वैशिष्ट्यपूर्ण चव यांमुळे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचं बनलं आहे.

मेलोडी इतकी चॉकलेटी क्यूँ है?

मेलोडीने 1990 च्या दशकात आपल्या जाहिरातींच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मेलोडीच्या लोकप्रियतेचं श्रेय मोठ्या प्रमाणावर जाहिरात मोहिमेला जातं. ‘मेलोडी इतनी चॉकलेटी क्यँ है’ हे स्लोगन प्रचंड लोकप्रिय झालं होतं आणि ही आजही भारतातील सर्वांत प्रसिद्ध जाहिरातींपैकी एक मानली जाते. ‘मेलोडी इतनी चॉकलेटी क्यूँ है? मेलोडी खाओ, खुद जान जाओ’, असं हे स्लोगन आहे. हे स्लोगन इतकं लोकप्रिय झालं की लोक गंमतीने ते रोजच्या संभाषणातही वापरू लागले. विशेष म्हणजे कंपनीने कधीही या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही आणि हीच तिची सर्वांत मोठी ‘मार्केर्टिंग’ शक्ती बनली. कंपनीने वर्षानुवर्षे या साध्या पण प्रभावी टॅगलाइनच्या जोरावर लोकांच्या मनात आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे.

मेलोडी केव्हा लाँच झालं?

मेलोडी चॉकलेटचे उत्पादक भारतातील अग्रगण्य बिस्किट आणि स्विट्स कंपनी ‘पार्ले’ करतं. पार्लेनं 1983 मध्ये हे चॉकलेट बाजारात आणलं. 1980 ते 1990 या दशकादरम्यान मेलोडीला भारतीय बाजारपेठेत प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यावेळी भारतात परदेशी चॉकलेट्सचे ब्रँड फार कमी होते आणि स्थानिक चॉकलेट्स, कँडी बाजारपेठेतही झपाट्याने वाढ होत होती. मेलोडीने अनोख्या कॅरेमल आणि चॉकलेटच्या मिश्रणाने बाजारपेठेत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Giorgia Meloni (@giorgiameloni)

मोदींनी दिलेली ही भेट खास का आहे?

जेव्हा मोठ्या स्तरावरील राजकीय भेटी होतात, तेव्हा सहसा महागड्या किंवा पारंपरिक भेटवस्तू देण्यावर अनेकांचा भर असतो. पण मेलोडीसारखं साधं दिसणारं हे चॉकलेट भारताच्या सर्वसामान्य लोकांशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे. मोदी आणि मेलोनी यांची भेट जेव्हा कधी होते, तेव्हा सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होते आणि विविध मीम्ससुद्धा व्हायरल होतात. नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यावरून ‘मेलोडी’ हा हॅशटॅग नेटकऱ्यांनी बनवला आणि जगभरात तो इतका व्हायरल झाला की याआधीच्या भेटीदरम्यान मेलोनी यांनी मोदींसोबतचा फोटो पोस्ट करताना त्यावरही ‘#Melodi’ असा हॅशटॅग दिला होता.

पार्लेची मालकी कोणाकडे?

पार्ले कंपनीचे प्रॉडक्ट्स पूर्वी ‘हाऊस ऑफ पार्ले’ या नावाने ओळखले जात होते. नंतर त्याची तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी झाली, ज्यांची मालकी आजही चौहान कुटुंबाकडेच आहे. या तीन कंपन्या म्हणजे पार्ले प्रॉडक्ट्स, पार्ले अॅग्रो आणि पार्ले बिस्लेरी. ‘मेलोडी’ हा ब्रँड पार्ले प्रॉडक्ट्सचा असून त्याचं व्यवस्थापन विजय चौहान, शरद चौहान आणि राज चौहान करतात.

विजय चौहान यांची एकूण संपत्ती

‘फोर्ब्स’च्या अहवालानुसार, विजय चौहान आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाज 8.6 अब्ज डॉलर्स आहे. तर पार्ले प्रॉडक्ट्सचा गेल्या वर्षीतील महसूल हा 8.5 टक्क्यांनी वाढून 15,568.49 कोटी रुपये झाला. या आर्थिक वर्षातील कंपनीचा नफा 979.53 कोटी रुपये होता. भारतीय स्विट्स बाजारपेठेत या कंपनीचा वाटा पंधरा टक्क्यांपर्यंत आहे. तर कंपनीचं बाजारमूल्य 8 ते 10 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे.

भलत्याच कंपनीला फायदा

मोदी आणि मेलोनी यांचा ‘मेलोडी’ चॉकलेटसोबतचा व्हिडीओ व्हायरल होताच गुंतवणूकदारांची ‘पार्ले’ नावाच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली. पण नावातील संभ्रमामुळे अनेकांनी पार्ले इंडस्ट्रीजचे शेअर खरेदी केले, ज्यामुळे मंगळवारी या शेअरने 5% अप्पर सर्किट गाठलं होतं. विशेष म्हणजे, मेलोडी चॉकलेट बनवणारी कंपनी ‘पार्ले प्रॉडक्ट्स’ शेअर बाजात सूचीबद्ध नाही. गुंतवणूकदारांनी मेलोडी बनवणारी कंपनी समजून चुकून रिअल इस्टेट कंपनी पार्ले इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक केली. ही कंपनी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि कागदी कचऱ्याच्या पुनर्वापराच्या व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

पार्ले प्रॉडक्ट्सची प्रतिक्रिया

शेअर बाजारातील तेजीवर पार्ले इंडस्ट्रीजने कोणतंही अधिकृत निवेदन जाही केलेलं नाही. तर पार्ले प्रॉडक्ट्सने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं, ‘पार्ले मेलोडीची जगाला ओळख करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. भारताची ही आवडती कँडी परदेशातही वाटली जात आहे, हे पाहणं आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.’





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देवस्थान इनाम जमीन कायदा लवकरच येणार, पहिल्या बैठकीत रुपरेषा ठरली
  • आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ..; मराठी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट
  • विद्यार्थ्याने अंडरगारमेंटमध्ये लपवलेले सिम कार्ड अन् मागच्या वर्षीचा पेपर…Neet पुर्नपरीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार
  • Vastu Shastra: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; आयुष्यच बदलून जाईल, सर्व आर्थिक संकटं होतील दूर
  • सोनाक्षी ग्लॅमरस लूकमध्ये पाहताच चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका, फोटो पाहून म्हणाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in