• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…

August 24, 2026 by admin Leave a Comment


नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले. मराठा समाजाच्या नेत्यांना खडेबोल सुनावताना मनोज जरांगे पाटील दिसले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मंत्री, आमदारांनी मराठा, कुणबींचे नुकसान करू नये. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे काम बंद करा. मराठा आणि कुणबींच्या लेकरांचे वाटोळे करू नका. धनगर समाजाने माझ्याकडून व्हावे, ओबीसींनी माझ्याकडून व्हावे, असे मी अजिबातच म्हणत नाही. मी जे पोटातले आहे, तेच बोलतोय. कारण मी गावखेड्यातील गरीब समाज बघितलाय. गाव खेड्यातील गरीब समाज मी बघितला आहे. मी सगळ्या जाती धर्माचे गरीब लोक बघितले आहेत, सत्य सांगतोय. आम्ही एकमेकांच्या बांधावर आहोत, एकमेकांच्या लग्नात आहोत. एकमेकांच्या सुख दुखात आहोत. उसने पैसे लागले तरीही आम्ही एकमेकांना पैसे देतो. ही सत्य स्थिती आहे.

इथल्या लोकांची दशा बघा. अगदीच मराठी आणि ओबीसीमध्ये दुरावा निर्माण केला जात आहे. पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, गरीब मराठे आणि ओबीसी आता हुशार झालेत. गाव खेड्यातही धनगर शोधून दाखवा. आजही शेळ्या मेंढ्या सांभाळून लेकरं मोठी करावी लागतात. आमची फसवणूक करतायत आमच्या लक्षात येतंय.

मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा. राजकारणत धनगर आणि मराठे काय मोठे होणार आहेत? लय झाले तर 200 ते 300 चा आकडा होईल, राज्यात. त्याने पोट भरणार आहे का? कारण नसताना मी कुणालाही बोलत नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. राजकीय आरक्षण संपलं, असं नेते ओरडतात. तुम्हाला हे समजले पाहिजे की, नोंदी सापडल्यानंतर तु्म्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावेच लागणार आहे.

रोजच्या संबंधांचे काय करायचे. आपल्या लेकरांना अधिकारी बनवणे गरेजेचे असल्याचे जरांगे यांनी म्हटले. भुजबळला कायदा समजतो, मंडळ आयोग समजतो, राज्य घटना आयोग, केंद्रीय मागास आयोग हे सगळे कळते. नोंदी मिळाल्याने हे द्यावेच लागणार आहे, हे माहिती आहे. मराठ्यांचा विरोध न करण्याचा भुजबळांच्या लक्षात आले.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in