• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लाजा सोडलेल्या पोरी… मराठी अभिनेत्रीने बोल्ड शूट करताच नेटकरी संतापले

August 24, 2026 by admin Leave a Comment


झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीनिवास’ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. या मालिकेत गाडेपाटलांची थोरली सून नीलांबरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी जाधव सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. मालिकेत सोज्वळ आणि पारंपरिक अंदाजात दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र मॉडर्न आणि बोल्ड लूकमध्ये अधिक सक्रिय आहे.

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

कल्याणी जाधव सोशल मीडियावर नियमितपणे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने पांढऱ्या नेट साडीमधील काही फोटो आपल्या अकाउंटवर अपलोड केले. या फोटोजमधील तिच्या अदा आणि बोल्डनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत. फोटोजसोबत तिने “आयुष्याच्या रंगात जगतेय” अशा अर्थाचे कॅप्शनही लिहिले आहे. नेट साडीला दिलेल्या मॉडर्न टचमुळे या फोटोजची सोशल मीडियावर खास चर्चा सुरू झाली आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

सध्या सोशल मीडियावर कल्याणीचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत चांगलेच सुनावले आहे. एका यूजरने, ‘लाजा सोडलेल्या पोरी… काय झाकायचं तेवढं तरी…’ अशी कमेंट करत सुनावले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, हेच राहिलं होतं आता… अशी कमेंट केली आहे. काहींनी तिच्या लूकला सेक्सी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalyani Jadhav (@kalyanijadhavofficial)

यापूर्वी केले होते शूट

यापूर्वीही कल्याणीने बाथटब मधील फोटो शेअर केले होते, ज्यांची त्यावेळीही बरीच चर्चा झाली होती. सध्या शेअर केलेल्या या बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना तिचा हा नवीन लूक आवडला आहे, तर काहींना मालिकेतील प्रतिमेपेक्षा वेगळा वाटत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalyani Jadhav (@kalyanijadhavofficial)

कल्याणी जाधवने यापूर्वी ‘पिंकीचा विजय असो’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या ‘लक्ष्मीनिवास’मधील तिच्या कामगिरीमुळे ती प्रेक्षकांच्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील सोज्वळ प्रतिमा आणि खऱ्या आयुष्यातील बोल्ड अंदाज यामधील फरकच तिच्या चर्चेचे मुख्य कारण ठरत आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय
  • लाजा सोडलेल्या पोरी… मराठी अभिनेत्रीने बोल्ड शूट करताच नेटकरी संतापले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in