• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Matka King Review : जुगाराच्या बादशाहची कथा, कशी आहे नागराज मंजुळेंची ‘मटका किंग’ सीरिज?

April 17, 2026 by admin Leave a Comment

'मटका किंग' ही नवीन वेब सीरिज नुकतीच प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. आठ एपिसोड्सच्या या सीरिजची कथा खऱ्या घटनांवर आधारित आहे. यामध्ये अभिनेता विजय वर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. ही कथा जुगाराचा बादशाह आणि चित्रपट निर्माता रतन खत्रीच्या जीवनावर आधारित आहे.

'मटका किंग'मध्ये 1960 च्या दशकातील मुंबईचं चित्रण करण्यात आलं आहे. महत्त्वाकांक्षा सत्ता नातेसंबंध आणि व्यवस्था यांना सीरिजमध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे. या सीरिजची सुरुवात दमदार असली तरी कथा जसजशी पुढे सरकते तशी त्याची पकड कमकुवत होऊ लागते.

'मटका किंग'मध्ये 1960 च्या दशकातील मुंबईचं चित्रण करण्यात आलं आहे. महत्त्वाकांक्षा, सत्ता, नातेसंबंध आणि व्यवस्था यांना सीरिजमध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे. या सीरिजची सुरुवात दमदार असली तरी कथा जसजशी पुढे सरकते, तशी त्याची पकड कमकुवत होऊ लागते.

काही ठिकाणी कथा इतक्या धीम्या गतीने पुढे जाते की तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून बघावंसं वाटतं. त्यामुळे आठ एपिसोड्सच्या जागी सहा एपिसोड्समध्येही कथा दाखवली जाऊ शकली असती. या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ जुगारापुरती मर्यादित नाही. यात क्रिकेट राजकारण मनोरंजन गिरणी कामगार आणि गुन्हेगारी विश्व यांच्याशी संबंधित कथाही पहायला मिळते.

काही ठिकाणी कथा इतक्या धीम्या गतीने पुढे जाते की तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून बघावंसं वाटतं. त्यामुळे आठ एपिसोड्सच्या जागी सहा एपिसोड्समध्येही कथा दाखवली जाऊ शकली असती. या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ जुगारापुरती मर्यादित नाही. यात क्रिकेट, राजकारण, मनोरंजन, गिरणी कामगार आणि गुन्हेगारी विश्व यांच्याशी संबंधित कथाही पहायला मिळते.

हे संपूर्ण जाळं उघडकीस आणू पाहणाऱ्या एका शोधपत्रकाराचा मागोवादेखील ही सीरिज घेते. 'मटका किंग' पाहताना अनेकदा 'स्कॅम 1992'ची आठवण येते. बॅकग्राऊंड म्युझिकच्या बाबतीत मात्र 'मटका किंग' तेवढी प्रभावी ठरत नाही. या सीरिजमध्ये गुलशन ग्रोवरने दमदार काम केलं आहे.

जर तुम्हाला थ्रिलर आणि सस्पेन्सची सीरिज पसंत असेल तर 'मटका किंग' कदाचित निराश करू शकते. वीकेंडला टाइमपाससाठी काही नवीन पहायची इच्छा असेल तर ही सीरिज नक्की पाहू शकता. ही वन टाइम वॉच सीरिज आहे. निर्माते या सीरिजचा दुसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात कलिंगडाची सालं म्हणजे त्वचेसाठी वरदान, तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये अशाप्रकारे करा समावेश
  • नाशिक IT प्रकरणात नवा ट्विस्ट! फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाखल करत म्हणाली…
  • 60 हजारांत हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, ओला ते हिरोपर्यंत ‘हे’ आहेत दमदार पर्याय
  • IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?
  • रामायणाबद्दल प्रकाश राज असं काही म्हणाले, थेट FIR दाखल; बीफ खाण्याबद्दलही वादग्रस्त विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in