• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकार दरबारी मोठ्या हालचाली, काय मोठी अपडेट?

September 1, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. सरकारला वेळ देऊनही कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याच्या नाराजीने त्यांनी उपोषणाचा हाक दिली. 29 ऑगस्टपासून ते उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. आज कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाविषयी चर्चा होणार आहे. पण त्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

वैद्यकीय उपचार आणि तापसणीसाठी जरांगेंचा नकार

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान डॉक्टरांचं पथक त्यांच्या तपासणीसाठी दाखल झाले. मनोज जरांगे यांना उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला बीपी तपासायची आहे. मात्र जरांगे यांनी पथकाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. डॉक्टरांनी तपासणीची विनंती केली. रात्रीपासून त्यांनी तपासणीसाठी नकार दिला आहे. मनोज जरांगे यांनी हाताने नाही म्हणून सांगितलं. तपासणीसाठी मनोज जरांगे यांनी नकार दिला.

आम्ही त्यांना वारंवार विनंती करत आहोत. त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला आहे. आमची वैद्यकीय तपासणी टीम इथे चं आहे आम्ही दर दोन तासाला येवून त्यांना विनंती करू. काल आम्ही तपासणी केल्यावर बीपी १३० आणि शुगर ७० च्या आसपास होती. आम्ही त्यांना विनंती करत आहोत, असे वैद्यकीय अधिकारी विजय वाकोडे यांनी माहिती दिली.

जलकुंभावर आमरण उपोषण

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. 100 फूट उंच जलकुंभावर बसून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. मराठा सेवक लक्ष्मण कदम आणि ओमप्रकाश कदम यांच आमरण उपोषण सुरू केले आहे. हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील जलकुंभावर बसून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. उपोषणस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला.

सोनवणे कुटुंब आंतरवाली सराटीत

वैजापूर तालुक्यातील सृष्टी सोनवणे हीच कुणबी प्रमाणपत्र रद्द केले. व्हॅलिडिटी मिळाली नाही त्याने जात पडताळणी समिती ने प्रमाणपत्र रद्द केले. कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळण्यासाठी मुलीने आंदोलन केलं होतं. सोनवणे कुटुंब पुन्हा मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहचले. कोणत्या तरी मंत्र्याने फ़ोन करून प्रमाणपत्र रद्द करायला लावल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. आता प्रमाणपत्र रद्द झाल आहे तर मला एक तर तीन लाख फी भरावी लागणार अन्यथा एक वर्ष वाया जाणार असा दावा त्यांनी केला आहे.

सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या शिष्टमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. हे शिष्टमंडळ सरकारची बाजू मांडणार आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर भेटीची वेळ ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. आजच्या बैठकीतही जरांगे पाटील यांच्या उपोषणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in