• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manoj Jarange: मनोज जरांगे यांचा एल्गार, आमरण उपोषणापूर्वी सरकारची मोठी भूमिका, अखेर तो डाव टाकलाच…

August 29, 2026 by admin Leave a Comment


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी सरकार सातत्याने फसवणूक करत असल्याचा आरोप करत आजपासून आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. आमरण उपोषणाची घोषणा त्यांनी केली आहे. आता गाफील राहु नका, निर्णायक लढाईला तयार राहा. अंतरवाली सराटीकडे कूच करा असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सरकारच्या शिष्टमंडळाने जारंगे पाटील यांच्या भेट घेतली. पण ही शिष्टाई कामी आली नाही. आता सरकारची या आंदोलनाबाबत मोठी भूमिका समोर येत आहे.

सरकारची वेट अँड वॉच भूमिका

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सरकारने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाबाबत सरकारमधून लागलीच प्रतिक्रिया समोर आली नाही. सर्व मराठा मंत्र्यांना सरकारची बाजू समाजापर्यंत पोहोचवण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सरकारची बाजू जनतेपर्यंत पोहचण्याचे काम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे समोर येत आहे. जात पडताळणी समितीच्या सदस्यांशी राधाकृष्ण विखे पाटील आज पुन्हा चर्चा करणार असल्याचे समजते. दरम्यान 14 लाख 31 हजार 634 जणांपैकी 14 लाख 24 हजार 634 जणांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र वाटप करा

अगदी थोड्यावेळापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा बांधवांना अंतरवाली सराटीत दाखल होण्याचे आवाहन केले. त्यांनी हा निर्णायक लढा असल्याचे म्हटले आहे. आपण 58 ऑगस्ट ला लेकर बाळांच्या कल्याणासाठी आपण उपोषण सुरू केलं. आपल्या मागण्या लेखी पण दिल्या आहेत तोंडी सांगितल्या आहेत. त्यांनी लिहून घेतल्या आहेत. आपली मागणी आहे 58 लाख शिंदे समिती जी गठीत केली होती. त्याची पोर्सिडिंग आपल्याला 6 वेळा दिली. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करा. तुम्ही म्हणाल मी एक महिना द्या होणार नाही, असे जरांगे म्हणाले. तलाठी, ग्रामसेवक यांनी सांगितलं होत की तुमची नोंद सापडली आहे. आज पासून प्रमाणपत्र वापर सुरू करा. ज्यांनी काढली आहे त्यांच्या वैलिडिटी द्या. अधिकारी चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप करत सरकारला सांगणे आहे सगळ्या व्हॅलिडिडी द्या, अशी मागणी त्यांनी केली.

मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना हैदरबाद गॅझेट नुसार प्रमाणपत्र द्या. त्याच्या वैलिडिटी कशा देणार ते पण सांगा. आमच्य कडे सगळे आकडे आहेत. निर्णायक या साठी म्हणतो सरकारला पळवाट काढायला मार्ग नाही. सरकार म्हणू शकत नाही अर्ज नाही दिला. हैदराबाद गॅझेट नुसार अर्ज केला नाही. कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. सातारा संस्थान, औंध, पुणे संस्थान गॅझेटियर काढून प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली. एकदा तुम्ही जी आर देणार. आम्ही घरी जाणार. आम्ही उन्हात बसलो होतो. गेले की परत येत नाहीत. आता सगळं एका जागेवर बसून होणार आहे. आता सोक्ष मोक्ष होणार आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘एकत्र जगलो, आता एकत्रच मरू…’; मरण समोर, पण आजारी नवऱ्याची साथ सोडण्यास नकार, रमायाची कहाणी डोळ्यात पाणी आणेल
  • Apple iPhone: पहिल्या फोल्डेबल आयफोनसह अजून एक मोठं सरप्राईज, ॲपलचा मोठा धमाका!
  • Rahul Gandhi : राहुल गांधींचा भाजप-RSS वर जोरदार हल्लोबाल; जन्म ते मृत्यू…देशात दलितांसोबत भेदभाव, दिले हादरवणारे पुरावे
  • जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, मागण्या चुकीच्या… गुणरत्न सदावर्ते यांची जोरदार टीका
  • मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप? शासनाकडून आकेडवारीच समोर, उपोषणापूर्वी मनोज जरांगेंचा तो मोठा आक्षेप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in