
मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्या लावून धरत मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी परत उपोषणााचं हत्यार उपसलं असून आजपासून ते अंतरवली सराटीत आंदोलन करत आहेत. त्यांचं हे शेवटचं आंदोलन असून त्यांनी मुंबईवर धडक देण्याचीही घोषणा केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईत धडकू असा इशारा त्यांनी आधीच दिला होता. आता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना याचा पुनरुच्चार केला. मुंबईत आंदोलन करणारच आहे, वर्षावरच आंदोलनाला बसणार आहोत आम्ही असं म्हणत मुंबई बंद पडो, मागे जावो , नाहीतर काही होवो, आम्ही येणारच असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी दिला.
जरांगेचा पुन्हा एल्गार
मुंबईत आम्ही आंदोलन करणारच आहोत, वर्षावरच जाऊन बसणारा आहोत आम्ही आंदोलनाला. जरा धांबा, दम धरा, बघा कशी लाट उसळते, मराठा आंदोलकांचा महाप्रलय येणार आहे. मुंबईत जाणारच आहेत मराठे, आता माघारी जाणार नाही आम्ही, असं जरांगे म्हणाले. पण आम्हाला मुंबई नाराज करायची नाही; मुंबई आमचीच आहे, मुंबईतील लोकं, तिथला मराठी माणूस , ओबीसी माणूस आमचा आहे. मुंबईतील कोणत्याही नागरिकाना त्रास झाला नाही पाहिजे. त्याना वाटलं पाहिजे मराठी आडमुठे नाहीत, सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत आहे, हे मुंबईकरांना समजले पाहिजे. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ देणार आहोत. इथं वेळ देणार आम्ही, पण ते नाही केलं तर मुंबईतली आणि महाराष्ट्रातील सगळी जनता म्हणेल, सरकार मूर्ख आहे. आमच्या पोरांना हात लावून तर दाखवा; त्यानंतर नेत्यांना सुट्टी देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
आंदोलनाबाबत भूमिका
“समाज आणि समाजातील लेकरांना मोठं करायचं, हेच आमचं स्वप्न आहे. तुम्ही लोकांना किती दिवस येड्यात काढणार? गेली तीन वर्षे आंदोलन केलं; आता हे शेवटचं आंदोलन आहे. सगळ्या पक्षांना आणि नेत्यांना मराठा समाज आपली ताकद दाखवून देणार आहे
बातमी अपडेट होत आहे
Leave a Reply