• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना झटका, सुख-दुखात साथ देणाऱ्या खासदाराने दिला राजीनामा

June 8, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्या राजकीय अडचणी वाढत चालल्या आहेत. आधी पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या अनेक आमदारांनी त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवला. आता ममता बॅनर्जी यांना दिल्लीत झटका बसला आहे. TMC चे राज्यसभा खासदार शुखेंदु शेखर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. खासदारकीसह पार्टीच्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिलाय. भ्रष्टाचाराविरुद्ध बोलल्यानंतर पक्षात मला वेगळं पाडण्यात आलं असा आरोप रॉय यांनी केला. शुखेंदु शेखर रॉय यांनी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा सोपवला. इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल बोलले की, या आघाडीचं काहीही भविष्य नाही. तृणमुल काँग्रेसमध्ये असलेल्या भ्रष्टाचारामुळे मी राजीनामा देतोय असं ते म्हणाले.

मागच्या पाच वर्षात जो भ्रष्टाचार झालाय, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मी सरकारकडे मागणी करतो असं रॉय म्हणाले. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवाबद्दल ते म्हणाले की, “आरजी कारच्या मुद्यामुळे नाराजी होतीच. पण त्याशिवाय अन्य मुद्यांमुळेही जनतेच्या मनात संताप होता”

बातमी काय होती?

तृणमुलचे दोन खासदार राज्यसभेचा राजीनामा देऊ शकतात अशी बातमी होती, त्यात शुखेंदु शेखर यांचं नाव होतं. कोयल मलिक यांचं नाव सुद्धा समोर आलेलं. त्यांना याचवर्षी एप्रिल महिन्यात तृणमुलने राज्यसभेवर पाठवलं आहे. अजून पर्यंत कोयल मलिक यांच्या राजीनाम्याची बातमी आलेली नाही.

भाजपचं कौतुक सुद्धा केलं

शुखेंदु शेखर रॉय वर्ष 2011 मध्ये तृणमुल काँग्रेसमध्ये सहभागी झालेले. त्यानंतर ते ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय बनले. प्रत्येक सुख-दुखात ते पक्षासोबत राहिले. पण ममता बॅनर्जी यांचं सरकार पडल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीचे वाईट दिवस सुरु झाले. त्यांनी सुद्धा पक्ष सोडला. एवढच नाही, शुखेंदु शेखर रॉय यांनी भाजपचं कौतुक सुद्धा केलं. त्यावरुन असं वाटतय की ते लवकरच भाजपत दाखल होतील. तृणमुल काँग्रेसची सध्या महाराष्ट्रातल्या शिवसेनेसारखी स्थिती झाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in