
राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस आहे. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, दुसरीकडे पाऊस धो धो सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा मोठा इशारा दिला. सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात काही मंडळांमध्ये तब्बल 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. कोकणात जोरदार पाऊस झाला. मात्र, आता पाऊस कमी होताना दिसतोय. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील जवळपास धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांवर पोहोचला आहे.
विदर्भातही पावसाने चांगली हजेरी लावली. सर्वत्र समाधानकारक पाऊस असून पिकेही चांगली आलीत. राज्यात गुरूवारी 65 किलोमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. आता पावसाचा जोर कमी होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. पण पाऊस अधिक कोसळत आहे. जून महिना कोरडा केला पण जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला पाऊस होतोय.
गुरुवारी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकलेल्या मान्सूनमुळे मोठा पाऊस झाला. उत्तरेकडे पावसाने हाहाकार घातला. अनेक कुटुंबांवर यामुळे मोठे संकट ओढवले. या पावसामुळे मेरठ, आग्रा, अलीगड आणि प्रयागराज यांसारख्या शहरांमधील कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 6 अंश सेल्सिअसने खाली आले. मुसळधार पावसामुळे घरे कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला.
नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला. नागपूर हवामान विभागाने दिला इशारा. काही जिल्ह्यांना साधारण पावसाचा इशारा तर अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला. नागपुरात सकाळपासून पावसाचं आणि ढगाळ वातावरण, काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात. हा पाऊस शेतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे, विदर्भात पाऊस चांगला झाला. एल निनोचे संकट यंदाच्या मॉन्सूनवर होते. पण दमदार पाऊस राज्यभरात कोसळताना दिसला.
Leave a Reply