
राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. काल रात्री पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली. यात काही पोलीस जखमी झाले. दुसरीकडे मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वारासह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Leave a Reply