
भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात घटना घडली आहे. सदरील गाडीमध्ये आमदार नारायण कुचे नव्हते तर त्यांचे चालक,सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी होता. आमदार नारायण कुचे आणि त्यांचे सहकारी छत्रपती संभाजी नगर वरून पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना अपघाताची घटना घडली आहे. अपघातात कोणती जीवित हानी झाली नाही. पण गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. तर पावसाबद्दल देखली मोठी अपडेट समोर येत आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडला आहे. पण शहरात कुठेच पाणी साचलं नाही. पहाटे पासून पावसाने विश्रांती घेतली असून, शहरातील लोकल आणि वाहतूक सुरळीत सुरू आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Leave a Reply