• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘ठरलं तर मग’मध्ये धमाकेदार वळण; सायलीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष

August 27, 2026 by admin Leave a Comment

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमातून सायलीला झालेली अटक अर्जुनवर झालेला जीवघेणा हल्ला आणि आता सायलीची केस लढणार कोण असा प्रश्न उभा ठाकला असताना आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. अर्जुनाच्या मदतीने सायलीच तिची केस लढणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमातून सायलीला झालेली अटक, अर्जुनवर झालेला जीवघेणा हल्ला आणि आता सायलीची केस लढणार कोण असा प्रश्न उभा ठाकला असताना आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. अर्जुनाच्या मदतीने सायलीच तिची केस लढणार आहे.

स्त्रीने लढायचं ठरवलं तर दहा हत्तीचं बळ तिच्यात संचारतं. सायलीही आपल्या बाळाला रडायचं नाही तर कसं खंबीरपणे लढायचं याचे संस्कार देतेय. या सगळ्या नाट्यमय घडामोडींसोबतच सायलीचा नवा लूकही सध्या चर्चेचा विषय ठरतोय. नेहमीच्या पारंपरिक लूकपेक्षा मॉडर्न अंदाजात सायली दिसणार असून तिच्या या नव्या रूपाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सायलीच्या व्यक्तिमत्त्वात झालेला हा बदल केवळ तिच्या लूकपुरता मर्यादित नसून तिच्या विचारांमध्ये आणि आत्मविश्वासातही झालेला बदल यातून दिसून येतो. सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी देखील या नव्या लूकमुळे खूपच उत्साही आहे. बऱ्याच दिवसांनंतर मॉडर्न अंदाजात वावरायला मिळत असल्यामुळे जुईसाठीही हा लूक खास आहे.

सायलीच्या व्यक्तिरेखेला मिळालेला हा नवा अंदाज आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात दिसणारा आत्मविश्वास साकारताना जुईला वेगळीच मजा येत आहे. नवा लूक नवा आत्मविश्वास आणि स्वतःसाठी लढण्याचा नवा निर्धार… सायलीच्या या नव्या रूपाचा प्रवास ‘ठरलं तर मग’मध्ये पाहायला मिळणार आहे.

सायलीच्या व्यक्तिरेखेला मिळालेला हा नवा अंदाज आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात दिसणारा आत्मविश्वास साकारताना जुईला वेगळीच मजा येत आहे. नवा लूक, नवा आत्मविश्वास आणि स्वतःसाठी लढण्याचा नवा निर्धार… सायलीच्या या नव्या रूपाचा प्रवास ‘ठरलं तर मग’मध्ये पाहायला मिळणार आहे.

आता सायली कायदेशीर लढाईत कशी बाजी मारणार? अर्जुन तिची साथ कशी देणार? आणि या सगळ्या संकटातून सायली आणि तिचं बाळ सुखरूप बाहेर पडणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागून राहणार आहे.

आता सायली कायदेशीर लढाईत कशी बाजी मारणार? अर्जुन तिची साथ कशी देणार? आणि या सगळ्या संकटातून सायली आणि तिचं बाळ सुखरूप बाहेर पडणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागून राहणार आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shweta Tiwari : आधी संताप, आता म्हणाली थँक्यू… श्वेता तिवारीने राज ठाकरेंचे मानले आभार; काय घडलं नेमकं?
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठणार का? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगून टाकलं की…
  • देवेंद्र फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर
  • ओबीसी प्रमाणपत्राच्या दाव्यावरून वडेट्टीवार यांची माफी, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काय दिला सल्ला?
  • MPSC Paper Leak :कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही’, अभिमन्यु पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in