
पुढील काही दिवस महामुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 3 ते 10 सप्टेंबरदरम्यान कोकणात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज असून 1 जून ते 30 ऑगस्टदरम्यान पालघरमध्ये सरासरीहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली. ठाणे, रायगड आणि मुंबईत सरासरीच्या आसपास पाऊस पडला. तर पुढील तीन ते पाच दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. जुलैमध्ये सरासरीहून अधिक पाऊस पडला होता, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मंदावला आहे. पावसाची तूट निर्माण झाल्याने काही भागांत उकाड्यात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेतील महापौरपदासाठी शिंदे सेनेचं ऑपरेशन ‘मिशन टायगर’ सक्रिय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. चार नेत्यांवर मिशन टायगरची जबाबदारी असून निलेश राणे, श्रिकांत शिंदे, राहूल शेवाळे आणि योगेश कदम यांच्यात काॅल झाल्याची माहिती आहे. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Leave a Reply