• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Lock UP Show : माझ्या बापाने पण एवढं kiss नाही केल… 52 वर्षांच्या राम कपूरने नको ते करताच भडकली श्रेया

July 20, 2026 by admin Leave a Comment


नेटफ्लिक्सच्या ‘लॉकअप 2’ शोमध्ये आता गेम चांगलाच रंगात आला आहे. श्रेया कालरा आणि राम कपूर यांच्यातील नातं कधी जुळताना तर कधी बिघडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात दोघांनी मिळून गेम खेळला होता. श्रेया कंट्रोलरच्या भूमिकेत होती, तर राम डिपेंडंट होता. रामला एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी झालेल्या प्रत्येक टास्कमध्ये श्रेयाने बाजी मारली आणि त्यामुळे रामची जागा सुरक्षित झाली. मात्र आता तीच श्रेया ही राम कपूरवर चांगलीच भडकली आहे. खरंतर टास्क जिंकल्यानंतर राम कपूर खूपच उत्साहित झाला होता. आणि त्याच आनंदाचा बरात त्याने श्रेयाच्या गालावर आणि कपाळावर अनेकदा किस केले. आता याच किसिंगवरून वाद निर्माण झाला आहे. शोमधलं वातावरण चांगलंच पेटलं आहे.

राम कपूरवर संतापली श्रेया

खरंतर टास्क जिंकल्यावर सुरक्षित झाल्यावर राम कपूरने जे केलं ते श्रेयाला फार आवडलं नाही. पण त्या वागण्यावर श्रेया तेव्हा काहीच बोलली नाही. मात्र आता ती संतापली असून तिने त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता तिने यावर नाराजी व्यक्त केली आहे. मागील एपिसोडमध्ये शिल्पा शिंदेसोबत बोलताना श्रेयाचा राग अनावर झाला आणि तिने राम कपूरवर जोरदार टीका केली.

श्रेया म्हणाली, “जेव्हा शिवांगी टास्क करत होती, तेव्हा राम कपूर तिच्या खूप जवळ गेले होते. त्यावेळी हर्षदने त्यांना दूर केले. राम तिथून बाजूला झाल्यावर हर्षद त्यांची माफी मागत होता. पण कशासाठी सॉरी? तो माणूस समोरच्याच्या तोंडावर येऊन थुंकतोय, हे त्याच्या तोंडावर सांगायला हवं. थोड्या तरी मर्यादा ठेवा. तुम्ही प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने वागत राहता.” अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली.

माझे वडीलही इतक्या वेळा किस करत नाही

पुढेही ती संतापून म्हणाली, “मी तुझ्यासाठी तीन टास्क जिंकले. पण माझ्या बाजूने उभं राहण्यासाठी तुझा एक हातही वर होत नाही. तू घाबरट आहेस. अशा सीनियर व्यक्तीचा मी आदर का करू? अशा सीनियरिटीवर थू आहे. जर फराह मॅडम मला विचारतील की मी असं का बोलले, तर मी त्याचं कारण सांगेन. यावर फक्त थू थू थू आहे. आणि जर यावेळी त्यांनी मला kiss करण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांचा चेहरा पकडून सांगेन – माझे वडीलसुद्धा मला इतक्या वेळा किस करत नाहीत, त्यामुळे आता असं करू नका.” असं म्हणत श्रेयाने तिचा संताप व्यक्त केला.

राम कपूरने शोमध्ये श्रेयाला किस केल्यानंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. “दोन मुलांचे वडील असलेल्या राम कपूर यांनी थोडं तरी भान ठेवायला हवं होतं.” असं काही युजर्सनी सुनावलं. तर रामचा हेतू चुकीचा नसला तरी सार्वजनिक ठिकाणी वागताना योग्य मर्यादा पाळायला हव्यात, असंही काहींनी म्हटलं.

एवढंच नव्हे तर ‘लॉकअप’च्या प्रीमियरच्या दिवशीही राम कपूरने स्टेजवर एकता कपूरला किस केलं होतं. त्यावेळीही त्याच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. आता या किसिंग वादावर राम कपूर काय प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in