• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..

June 23, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप सीझन 2’ (Lock Upp Season 2) मुळे चर्चेत आहे. यावेळी तो फराह खानसोबत या लोकप्रिय रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या शोच्या लाँचदरम्यान एक घटना अशी घडली जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लॉक अप सीजन 2 दरम्यान मीडियातील एकाने रितेश देशमुखला त्याचे जवळचे मित्र सलमान खान आणि संजय दत्त यांच्याबद्दल एक असा प्रश्न विचारला, ज्यामुळे अभिनेत्याचा पारा चांगलाच चढला. त्याने सर्वांसमोरच त्या इसमाची शाळा घेतली. त्याची ही प्रतिक्रिया चांगलीच लक्ष वेधून घेणारी ठरली असून व्हिडीओ बराच व्हायरल झालाय.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान, एा पत्रकाराने रितेशला विचारलं की, सलमान खान आणि संजय दत्त, तुमचे जवळचे मित्र, त्यांना ‘लॉक-अप’चा (तुरुंगवासाचा) मोठा अनुभव आहे. मग तुम्ही त्यांना या शोमध्ये (Lock Up Season 2 ) आमंत्रित कराल का जाईल का, आणि तसं झालं तर त्यांना शिक्षा कोणीत दिली जाईल? सलमान आणि संजय दत्तचं नाव ऐकताच आधीच रितेशच्या भुवया उंचावल्या आणि तो प्रश्न पूर्ण ऐकताच त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याने लगेचच याचे उत्तर देण्यास नकार दिला.

रितेश देशमुख भडकला

बऱ्याचदा खेळीमेळीने वागणारा, मजा करणारा रितेश देशमुख यावेळी मात्र फार गंभीर दिसला. आणि अशा कोणत्याही प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही, असं सांगत त्याने डायरेक्ट नकार दिला. अशा प्रश्नाचे उत्तर देऊन मला, तुमच्या प्रश्नाला महत्व द्यायची इच्छा नाही, असं त्याने अत्यंत कठोर स्वरात सांगितलं. रितेशच्या मते, हा प्रश्न उत्तरास पात्र नव्हता, त्यामुळे उत्तर देण्यास नकार दिला.

मात्र रितेशच्या या प्रतिक्रियेने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तरीही, वाद घालण्याऐवजी त्याने अत्यंत संयमाने आपली भूमिका मांडली आणि तो पुढे निघून गेला. आपल्या मित्रांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे रितेश चांगलाच नाराज झाल्याचं यावेळी दिसून आलं. मात्र काही लोकांना त्याचं वागणं उद्धटपणाचं वागलं असून या व्हिडीओवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Movie Talkies (@movietalkies)

नेटफ्लिक्सवर रिलीज होणार शो

रितेश देशमुख आणि फराह खान हे दोघे होस्ट करत असलेल्या ‘लॉक अप’ (Lock Upp) या शोचा दुसरा सीझन यावेळी नेटफ्लिक्सवर (Netflix) येणार आहे. या शोचा पहिला सीझन कंगना रणौतने होस्ट केला होता आणि त्या सीझनमधून मुनव्वर फारुकीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं
  • IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक
  • मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
  • Amitabh Bachchan : जगभरात त्यांचे लाखो चाहते, पण बिग बी कोणाचे फॅन ? अमिताभ बच्चन यांची आवडती गझल कोणती ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in