• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amitabh Bachchan : जगभरात त्यांचे लाखो चाहते, पण बिग बी कोणाचे फॅन ? अमिताभ बच्चन यांची आवडती गझल कोणती ?

August 26, 2026 by admin Leave a Comment


‘कौन बनेगा करोडपती सीझन 18’ च्या मंचावर अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे अनेकदा त्यांच्या आयुष्यातील किस्से, त्यांची आवड-निवड आणि जुने किस्से याबद्दल बोलत असतात. त्यांच्या धीरगंभीर, भक्कम आवाजाचे अनेक चाहते आहेत. अनेकदा बिग बी हे केबीसीच्या सेटवर एखादी कविता म्हणून दाखवतात किंवा कधीतरी गाणंही गुणगुणतात. त्यांच्या गायनानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, बिग बींची आवडती गझल कोणती? ‘कौन बनेगा करोडपती सीझन 18’ च्या आगामी भागात अमिताभ यांनी त्यांच्या आवडत्या गजलेबद्दल आणि गायकाबद्दल सांगितलं.

अमिताभ बच्चन यांची आवडती गझल

केबीसीच्या आगामी भागात स्पर्धक अनुज भटनागर यांच्याशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंह यांच्याबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करत त्यांची एक आवडती गझलही सांगितली. केबीसीमध्ये आलेल्या अनुज भटनागर यांनी सांगितलं की, कामाच्या थकव्यानंतर गझल ऐकून ते स्वतःला रिलॅक्स करतात. मी स्वतः जगजीत सिंह यांचा चाहता आहे, असे सांगत अनुज यांनी एक गझलही सादर केली. त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांची आवडती गझल कोणती असं विचारलं. तो प्रश्न ऐकून शहेनशाह म्हणाले, “मी अनेक गझल ऐकत असतो, कधी-कधी संगीताचाही आनंद घेत असतो. जगजीत सिंह यांची‘आहिस्ता आहिस्ता’ ही एक अतिशय सुंदर गझल आहे, जी मला खूप आवडते” असं त्यांनी नमूद केलं.

जगजीत सिंह यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

यानंतर स्पर्धक अनुज यांनी अमिताभ बच्चन यांना जगजीत सिंह यांच्यासोबतच्या काही आठवणींबद्दल विचारलं. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि त्यांचे वडील, प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन, या दोघांचेही जगजीत सिंह यांच्यासोबत व्यावसायिक आणि कलात्मक संबंध होते. अमिताभ यांनी सांगितलं की, सर्जनशील क्षेत्रातील कलाकारांच्या अनेकदा भेटीगाठी होत असतात. अशा भेटींमध्ये लेखन, गायन आणि संगीताबाबत चर्चाही रंगत असते.

यावेळी कवितेबद्दल बोलताना अमिताभ यांनी एक सुंदर निरीक्षण मांडलं. त्यांच्या मते, प्रत्येक चांगल्या कवितेत कुठेतरी एक लपलेला सूर आणि लय दडलेली असते. कविता नीट वाचली तर तिच्या शब्दांमध्ये एक विशिष्ट ताल जाणवतो. गायक हीच लय ओळखतो आणि त्यानुसार कवितेला सुरांचा साज चढवतो, असं बिग बी म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?
  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in